शनिवार, नोव्हेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शिक्षक दिनाला बससेवेची ग्रेट भेट; गणेशगाव परिसरातील ७० विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न सुटला

सप्टेंबर 5, 2022 | 6:21 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220905 WA0018

 

त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील गणेशगाव ग्रामपंचायत परिसरातील विद्यार्थ्यांना त्र्यंबकेश्वर येथे शाळा आणि कॉलेजला जाण्यासाठी एसटी बसचा शुभारंभ करण्यात आला. सोशल नेटवर्किंग फोरमच्या प्रयत्नाने आणि कर्तव्यदक्ष एसटी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही खास बस सेवा सुरु करण्यात आली आहे. याप्रसंगी एसएनएफचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, एसटीचे अधिकारी श्री, विनोद गणोरे, रामकृष्ण मिशनचे श्री. कंठानंद स्वामी, धनराज जाधव, शरद महाले, देवचंद महाले, ग्रामसेवक बाळासाहेब सांगळे हे मान्यवर उपस्थित होते.

गणेशगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणारे सर्व गावं तसेच आसपासच्या परिसरातील अनेक गावांमध्ये सातवीनंतर शाळा नाही. नंतर या मुलांना पुढील शिक्षणासाठी त्रंबकेश्वर येथे जावे लागते. तथापि या गावांमधून बसची सोयच नसल्याने अनेक मुलांचे आणि विशेषतः मुलींचे पुढील शिक्षणच बंद होण्याच्या मार्गावर होते. ही बाब लक्षात घेत जागरूक नागरिक शरद महाले यांनी एसएनएफचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांना बससाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.

गायकवाड यांनी त्वरित दखल घेत मुलांच्या शिक्षणाशी संबंधित गंभीर समस्या एसटी अधिकारी नितीन मैंद आणि अरूण सिया या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली. विशेष आनंदाची बाब म्हणजे कोणतीही दिरंगाई न करता एसटीच्या अधिकाऱ्यांनी बसची मागणी त्वरित मंजूर करून गणेशगाव त्र्यंबकेश्वर बससेवा दि. ५ सप्टेंबर रोजी सुरु झाली. परिसरातील विद्यार्थी आणि शेकडो नागरिकांनी बसचे हार फुलांनी सजवून, वाजत गाजत मोठ्या उत्साहात स्वागत केले. या प्रसंगी एसटीचे अधिकारी विनोद गणोरे, धनराज जाधव, सुभाष सानप, अमेय भोसले, चालक पी जी शेलार, वाहक श्रीमती पी आर राठोड यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.

प्रमोद गायकवाड यांनी बसचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले तर श्री. गणोरे यांनी एसटीच्या विविध लोककल्याण योजनांची माहिती दिली. याप्रसंगी नथू उदार, केशव खोटरे, जयराम महाले, रुक्मिणी उदार, प्रवीण महाले, वेणूबाई खोटरे हे आणि आणि परिसरातील शेकडो ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सतीश पवार यांनी, आभार प्रदर्शन देवचंद महाले यांनी केले.

माणुसकीचे दर्शन
गणेशगाव परिसरातील विद्यार्थ्यांची समस्या एसएनएफचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी एसटीचे विभागीय आयुक्त श्री. नितीन मैंद यांना कळवली. श्री. मैंद यांनी नाशिक विभाग अधिकारी अरुण सिया, कैलास पाटील आणि विनोद गणोरे यांच्याकडे हा प्रश्न सोपवला. अतिशय समाधानाची बाब म्हणजे खेड्यातील मुलांचे शिक्षण खंडित होणार असल्याचा प्रश्न गांभीर्याने घेऊन या सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय वेगाने निर्णय घेतले. त्यानंतर केवळ आठ दिवसात ही बससेवा सुरु करून एसटी अधिकाऱ्यांनी सावित्रीच्या लेकींसाठी आपल्यातील माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले.

“एसटी नेहमीच नफ्या तोट्याचा विचार न करता विद्यार्थी हितासाठी दुर्गम भागात आपली सेवा देत असते. यापुढेही आम्ही प्रयत्नशील राहू.”
– नितीन मैंद, विभागीय अधिकारी,एसटी
“दुर्गम भागातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी एसएनएफ प्रयत्नशील आहे. एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे विशेष धन्यवाद.”
– प्रमोद गायकवाड, अध्यक्ष, एसएनएफ

Teachers Day Gift Ganeshgaon 70 Student Get ST Bus Service
Trimbakeshwar Social Networking Forum

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार कामगार ठार

Next Post

लिझ ट्रस होणार ब्रिटनच्या पंतप्रधान; नारायण मूर्तींचे जावई ऋषी यांना टाकले मागे

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
Liz Truss

लिझ ट्रस होणार ब्रिटनच्या पंतप्रधान; नारायण मूर्तींचे जावई ऋषी यांना टाकले मागे

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011