बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लिझ ट्रस होणार ब्रिटनच्या पंतप्रधान; नारायण मूर्तींचे जावई ऋषी यांना टाकले मागे

by India Darpan
सप्टेंबर 5, 2022 | 6:57 pm
in संमिश्र वार्ता
0
Liz Truss

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लिझ ट्रस ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान असतील. ऋषी सुनक यांना मागे टाकून त्या जिंकल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात लिझ ट्रस यांना ८१ हजार ३२६ मते मिळाली. तर ऋषी सुनक यांना अवघी ६० हजार ३९९ मते मिळाली. तिसर्‍या म्हणजेच शेवटच्या टप्प्यात लिझ ट्रस या ऋषी सुनक यांच्यापेक्षा खूप पुढे असल्याचे सर्वेक्षणात सांगण्यात आले.

आज संध्याकाळी नवीन पंतप्रधानांच्या नावाची घोषणा करण्यात आली. बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनमध्ये मुदतपूर्व निवडणुका झाल्या. विशेष बाब म्हणजे ऋषी सुनकने पाच फेऱ्यांमध्ये लिझ ट्रसला मागे टाकले होते मात्र अंतिम फेरीत लिझ ट्रसने बाजी मारली.

भारतीय ज्येष्ठ उद्योजक नारायण मूर्ती यांचे ऋषी सुनक हे जावई आहेत. तसेच, ऋषी हे बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारे ते पहिले होते. बोरिस जॉन्सन यांना ऋषी सुनक यांनी पंतप्रधान व्हावे असे वाटत नव्हते. शेवटच्या टप्प्यात कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सुमारे १ लाख ६० हजार सदस्य मतदान करणार होते. या टप्प्यात ऋषी सुनक यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

४७ वर्षीय लिझ ट्रस या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान असतील. ब्रिटनमध्ये ते उजव्या विचारसरणीचे नेते म्हणून ओळखले जातात. लिझच्या आधी मार्गारेट थॅचर आणि थेरेसा या महिला पंतप्रधान होत्या. शेवटच्या फेरीत एकूण ८२.६ टक्के मतदान झाले होते. ६५४ मते नाकारण्यात आली. लिझ ट्रस हे बोरिस सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होते. त्या ६ वेळा मंत्री होत्या.

बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्याच पक्षातील दबावामुळे ७ जुलै रोजी राजीनामा दिला. मात्र, नवे पंतप्रधान निवडून येईपर्यंत ते पदावर राहिले. आता मंगळवारी जॉन्सन पंतप्रधान म्हणून आपले शेवटचे भाषण देतील आणि राजीनामा देण्यासाठी स्कॉटलंडमधील अबर्डीनशायर येथे जातील. राणी एलिझाबेथ यांच्याकडे ते आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत. लिझ स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे शपथ घेणार आहेत. त्यानंतर त्या १० डाऊनिंग स्ट्रीटवरून पंतप्रधान म्हणून पहिले भाषण देतील.

Liz Truss will Be New Prime Minister of Britain

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिक्षक दिनाला बससेवेची ग्रेट भेट; गणेशगाव परिसरातील ७० विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न सुटला

Next Post

सावधान! नगर जिल्ह्यात लम्पी स्कीन रोगाचा वेगाने फैलाव; आतापर्यंत ३ जनावरांचा मृत्यू

India Darpan

Next Post
lampi skin

सावधान! नगर जिल्ह्यात लम्पी स्कीन रोगाचा वेगाने फैलाव; आतापर्यंत ३ जनावरांचा मृत्यू

ताज्या बातम्या

Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011