India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी सत्यजित तांबे यांना टीडीएफचा जाहीर पाठिंबा

India Darpan by India Darpan
January 20, 2023
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (वृत्तसेवा) पदवीधर, बेरोजगार ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, डॉक्टर ,वकील यांसह विविध आस्थापनांमध्ये काम करणारे शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करणारे आमदार डॉ सुधीर तांबे यांच्याच कार्यकर्तुत्वाचा वारसा जपणारे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी राष्ट्रीय शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) ने अधिकृत जाहिर पाठिंबा दिला आहे.

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ ) च्या राज्यकार्यकारणाची बैठक महाराष्ट्र हायस्कूल पुणे येथे राज्य अध्यक्ष विजय बहाळकर यांच्या अध्यक्षतेत झाली यावेळी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, कार्यावाह हिरालाल पगडाल, कार्याध्यक्ष जी के थोरात (पुणे) विभाग कोकण विभागाचे नरसू पाटील, नानासाहेब पुंडे (मुंबई) पुणे विभागाचे सचिव के एस ढोमसे, धुळे जिल्हाध्यक्ष संजय पवार ,सहसचिव डॉ. एन डी नांद्रे, खजिनदार संदीप घोरपडे, जळगावचे आर्. एच बाविस्कर, अहमदनगरचे आबासाहेब कोकाटे ,नाशिकचे रवींद्र मोरे, अशोक नवल ,राजेंद्र लांडे, भाऊसाहेब कचरे ,सुधीर काळे (नगर) नरेंद्र पाटील (नंदुरबार) कुशारे (नाशिक) दत्ता आरोटे, दशरथ मांडे, सुरेश झावरे, अरविंद कडलग, जिजाबा हासे (संगमनेर) आदींसह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना टीडीएफ तर्फे उमेदवारीसाठी पुरस्कृत करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष विजय बहाळकर म्हणाले की, टिडीएफ संघटनेच्या पाठिंबावर मागील तीन वेळा आमदार डॉ. तांबे यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे . सर्व पदवीधर व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवताना त्यांनी मागील बारा वर्षात शिक्षकांचे व शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न प्राधान्याने सोडवले आहेत. याचबरोबर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पदवीधर या सर्व मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे .शिक्षक आणि पदवीधर यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. याचबरोबर अहमदनगर ,धुळे ,जळगाव, नंदुरबार ,नाशिक जिल्ह्यातील सर्व टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहेत. आमदार डॉ.सुधीर तांबे व त्यांचा परिवार हा पुरोगामी विचार जपणारा असून नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांना टीडीएफ पूर्ण पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले

तर हिरालाल पगडाल म्हणाले की, लोकशाही, समाजवाद, विज्ञान निष्ठा ,धर्मनिरपेक्षता जपण्यासाठी पीडीएफने सातत्याने काम केले असून सत्यजित तांबे याच विचारांनी राज्यभर काम करत आहेत. म्हणून आगामी नाशिक पदवीधर मतदारसंघ च्या निवडणुकीत राज्यातील टिडीएफ एकमताने त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे.
यावेळी टीडीएफचे कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, संजय पवार, नानासाहेब पुंडे, आर एच बाविस्कर डॉ. एन.डी. नांद्रे आदींनी मनोगते व्यक्त केली सत्यजित तांबे यांना टीडीएफने दिलेल्या पाठिंब्याचे धुळे, जळगाव ,नंदुरबार ,नाशिक, अहमदनगर मधील विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी स्वागत केले आहे.


Previous Post

या सहा शहरांमध्ये कामगारांसाठी सुरू होणार हॉस्पिटल; लाखो कामगारांना फायदा

Next Post

शेकडो योजना…. कोट्यवधींचा निधी… गतिमान प्रशासन… प्रगतीशील सरकार… तरीही अनेक दशकात आदिवासी गरिबीतच.. का?

Next Post

शेकडो योजना.... कोट्यवधींचा निधी... गतिमान प्रशासन... प्रगतीशील सरकार... तरीही अनेक दशकात आदिवासी गरिबीतच.. का?

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group