इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील सर्वांत मोठा उद्योग समूह टाटा त्यांच्या वाहनांमधील व्हेरायटीसाठी ओळखला जातो. पण शेअर मार्केटमध्ये खेळणाऱ्या लोकांचेही टाटाच्या शेअर्सवर पूर्ण लक्ष असते. त्यांच्यासाठी टाटा कंपनी वेगळ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आता टाटा कंपनीने १९ वर्षांनंतर एक असा निर्णय घेतला आहे की ज्यामुळे लोकांना कमाईची संधी चालून आली आहे.
टाटा उद्योग समूहाने 19 वर्षांनंतर IPO आणण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा सन्सचे विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळातील टाटा समूहाचा हा पहिला IPO असेल. टाटा मोटर्सची उपकंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीने बाजार नियामक सेबीकडे यासंदर्भातील कागदपत्रे सादर केली आहेत. त्यानुसार, हा इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) असेल आणि त्यात एकही नवीन शेअर जारी केला जाणार नाही. मात्र, आयपीओच्या माध्यमातून किती निधी उभारला जाईल आणि आयपीओची प्राइस बँड काय असेल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. टाटा टेक्नोलॉजी ही टाटा मोटर्सची उपकंपनी आहे आणि कंपनीने 09 मार्च रोजी SEBI कडे DRHP दाखल केला. यामध्ये टाटा मोटर्स व्यतिरिक्त, इतर दोन विद्यमान भागधारक शेअर्सची विक्री करतील.
१९ वर्षांपूर्वी…
यापूर्वी टाटा समूहाच्या कंपनीचा आयपीओ 19 वर्षांपूर्वी आला होता. टाटा समूहाने 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चा IPO आणला. TCS ही आज देशातील दुसरी सर्वांत मोठी कंपनी आहे.
अशी असेल विक्री
या IPO द्वारे 95,708,984 इक्विटी शेअर्सची विक्री केली जाईल. हे शेअर्स कंपनीच्या एकूण पेड-अप शेअर कॅपिटलच्या 23.60 टक्के आहेत. या कंपनीत टाटा मोटर्सचा 74.42 टक्के हिस्सा आहे. तसेच 8.96 टक्के हिस्सा अल्फा टीसीकडे आणि 4.48 टक्के टाटा कॅपिटल ग्रोथ फंडाकडे आहे. टाटा मोटर्स या इश्यूद्वारे 81,133,706 इक्विटी शेअर्सची विक्री करेल.
Tata Sons IPO SEBI Tata Technology After 19 Years