India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अशी आहे नाशिकची रहाडपंचमी… जाणून घेऊया, तब्बल ३०० वर्षांच्या या अनोख्या परंपरेबद्दल

India Darpan by India Darpan
March 12, 2023
in विशेष लेख
0

 

मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
होळी पासून ते रंगपंचमी पर्यंत रंगांचा उत्सव साजरा केला जातो, रंगांची उधळण म्हणजे आनंद होय. महाराष्ट्रातील विविध प्रांतांमध्ये हा रंगांचा उत्सव वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. परंतु नाशिक शहरामध्ये मात्र रंगपंचमीला रंगांची उधळण होते.
विशेष म्हणजे या शहरातील तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या रहाड म्हणजेच मोठ्या हौद होय. यात ही रंगपंचमी अत्यंत जल्लोषात खेळण्यात येते. जुने नाशिक आणि पंचवटी भागात अशा अनेक रहाडी असून त्या आता खुल्या करण्यात आल्या आहेत, उद्या या रहाडीमध्ये अबालवृद्ध रंगाने न्हाऊन निघतील. या रहाडीत रंग खेळण्यासाठी दरवर्षी शेकडो नागरिकांची झुंबड उडते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा रहाडी रंगोत्सव साजरा झाला नाही. कोरोनामुळे या उत्सवावर बंद होती. तत्पूर्वी एकदा दुष्काळामुळे ही रहाड बंद होती. मात्र, यंदा तो उत्साहात साजरा होणार आहे.

रंगपंचमीचा दिवस महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांत अत्यंत उत्साहाने आणि वैशिष्टयपूर्ण पद्धतीने साजरी केली जाते. नाशिक परिसरात ऐतिहासिक महत्व असलेले रहाड म्हणजेच पुरातन दगडी बांधकाम असलेल्या हौदात रंगोत्सव मोठ्या आनंदाने साजरा होतो. नाशिकच्या रंगपंचमीची ही दृश्य नक्की पहा! pic.twitter.com/WMsureibLT

— Maharashtra Tourism (@maha_tourism) March 23, 2022

नाशिकमधील अत्यंत जुनी परंपरा असलेला हा ऐतिहासिक पेशवेकालीन रहाड रंगोत्सव राज्यभरात प्रसिद्ध आहे. राज्यात अनके ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करत रंग खेळला जातो. मात्र, नाशिक येथे होळीनंतर पाचव्या दिवशी मोठ्या उत्साहात रहाड रंगोत्सव साजरा केला जातो. यंदा हा रंगोत्सव उद्या मंगळवार दि. २२ मार्च रोजी मोठ्या उत्साहात होणार आहे. रहाड म्हणजे भला मोठा भूमिगत हौद. या रंगोत्सवात शहरातील रहाडींमध्ये रंग करून मोठ्या उत्साहात सण साजरा केला जातो.

नाशिक रंगपंचमी #रहाड 😍 pic.twitter.com/naTDs4bnFe

— भिकु 🔥👇 (@bhiku_07) March 22, 2022

जुन्या नाशिकमधील शिवाजी चौकात साती आसरा मंदिरासमोर एका पेशवेकालीन रहाडीचा शोध लागला आहे. यावर्षी ही रहाड रंगोत्सवासाठी खुली करण्यात येणार होती. मात्र, दुरुरुस्तीच्या कामाखातर ती उघडता येणार नाही. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा रंगोत्सव साजरा झाला नाही. मात्र, शहरातील कोरोना निर्बंध हटवल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार यंदा या ऐतिहासिक रंगोत्सवाला पोलीस आणि प्रशासनाने परवानगी दिली आहे.

याला म्हणतात #रंगपचमी 😍
आतुरता उद्याची तब्बल दोन वर्षांनंतर 🤩#नाशिक #रहाड pic.twitter.com/3tA64Ju9Fk

— Swarup Rahane (@swaruprahane88) March 21, 2022

जुने नाशिक भागात पेशवेकाळात बांधलेल्या रहाडी म्हणजेच भूमिगत मोठे हौद आहेत. या रहाडीवरून सतत वाहतूक, रहदारी सुरू असते. मात्र, रंगोत्सवाच्या आधी या रहाडी खोदल्या जातात. त्यांची साफसफाई, स्वच्छता, डागडुजी केली जाते. त्यांची पूजा होते. या रहाडीत रंग टाकून त्यांच्यात पाणी भरले जाते. रंगपंचमीदिवशी या रहाडीभोवती तरुण गोल उभे राहतात. रहाडीतल्या पाण्यात तरुण जोरदार सूर मारतात. तरुण पाण्यामध्ये पडल्यावर त्या धप्प्याने काठावर उभे असलेले सारेच रंगात न्हाऊन निघतात. रहाडीमध्ये असे सूर मारून जोरदार रंगपंचमी साजरी केली जाते. यावेळी रहाडीमध्ये उंच उडी मारण्यासाठी तरुणांमध्ये स्पर्धा रंगते.

नाशिकच्या संस्कृती ची ओळख#रहाड💖💖#नाशिक @Nashikconnect_ pic.twitter.com/oZmxd3Vg8r

— Narayan_Kharat.🇮🇳🌾🌾 (@NarayanKharat13) March 22, 2022

विशेष म्हणजे रहाडीतील रंगोत्सवासाठी रंग वेगळ्या पद्धतीने बनवला जातो. त्यासाठी पाने, फुले, हळद, कुंकू हे सर्व पदार्थ एकत्र करून चार ते पाच तास एका भांड्यात गरम करून ठेवतात. तिवंधा चौक आणि शनी चौकातील रहाड खोल आणि रूंद आहे. रंगोत्सव संपल्यानंतर सागवानी लाकडांचे मोठमोठया फळ्याचा वापर करून ही रहाड बुजवली जाते. या रगाडीत रंगाचे पाणी असते. त्यावर उसाचे चिपाड आणि माती टाकली जाते. ही रहाड पुन्हा थेट पुढल्या वर्षी रंगपंचमीसाठी खुली केली जाते.

नाशिक रंगपंचमी उत्सव
रहाड परंपरा#नाशिक #Nashik @NashikNews @WeAreNashik pic.twitter.com/fsjox08CN3

— Prasad Garbhe 🇮🇳 (@Prasad_garbhe) March 13, 2020

जुने नाशिकमध्ये जुनी तांबट गल्ली, तिवंधा चौक, काजीपुऱ्यातील दंडे हनुमान चौक, गाडगे महाराज पुलाखालील दिल्ली दरवाजा, पंचवटीतील शनी चौक आणि शिवाजी चौकातील साती आसरा मंदिरासमोर या रहाडी आहेत. या रहाडीमध्ये रंगोत्सव खेळण्यासाठी गुलाबी रंग टाकला जातो. या रंगात अंघोळ केल्यामुळे कसलाही त्वचारोग होत नाही. उन्हाळ्यात उन्हाचा कसलाही त्रास होत नाही, म्हटले जाते.

नाशिक परिसरात ऐतिहासिक महत्व असलेले रहाड म्हणजेच पुरातन दगडी बांधकाम असलेल्या हौदात रंगोत्सव मोठ्या आनंदाने साजरा होतो. नाशिकच्या रंगपंचमीची ही दृश्य द्रोण कॅमेरा ने टिपलेले आहे.. pic.twitter.com/LM5unAAW4V

— जीवन तांबट (@jeevan_tambat) March 22, 2022

Nashik Rangapanchami 300 Years Old Tradition Rahad Panchami Colours


Previous Post

टाटा देणार कमाईची संधी! तब्बल १९ वर्षांनंतर आला हा योग… आता घेऊनच टाका…

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023

चिपळूण-कराड रेल्वे मार्ग प्रकल्पाचे घोडे नेमके कुठे अडले? राज्य सरकार म्हणाले

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group