India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पालकमंत्री दादा भुसेंच्या घरासमोर ‘स्वाभिमानी’चे आजपासून ठिय्या आंदोलन

India Darpan by India Darpan
January 16, 2023
in राज्य
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील घरासमोरस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आजपासून ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. तसा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गेल्याच महिन्यात दिला होता. नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून सक्तीची वसूली मोहीम सुरू आहे. यामध्ये मात्र काही थकबाकीदारांना वगळून जिल्हा बँकेने गरीब शेतकऱ्यांनाच वेठीस धरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या या कारवाईस विरोध दर्शविला आहे. तसेच काही कर्जदार शेतकऱ्यांचे खासगी वाहने देखील जिल्हा बँकेने जप्त करण्यात सुरू केली आहे. बँकेच्या या मनमानी विरोधात स्वाभिमानी शेतकऱ्यांनी संघटनेने पालकमंत्र्यांच्या घरासमोर बिऱ्हाड मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

जिल्हा बँकेच्या जप्ती मोहिमे विरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या कारणांमुळे शेतकऱ्यांची बाजू घेत स्वाभिमानी शेतकरी संघननेने यापूर्वी बैठक घेतली होती. त्यानुसार सोमवारी, दि. १६ जानेवारी २०२३ रोजी बिऱ्हाड आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत व्हिडिओ शेअर केला आहे. राजू शेट्टी यांनी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. जिल्हा बँकेने सुरू केलेली वसूली थांबवावी, कर्ज माफ करू नका पण काहीतरी सवलत द्या यासाठी हातातील काम सोडून या आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन केले आहे. परंतु राजू शेट्टी यांनी यावेळी शेतकऱ्यांना आंदोलनात बघ्याची भूमिका घेऊ नका, असे थेट सुनावत आंदोलन अधिक आक्रमकपणे करण्यासाठी आवाहन केले आहे.

विशेष म्हणजे या बिऱ्हाड आंदोलनात जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर बिऱ्हाड मोर्चा काढून आंदोलन पुकारणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी नाशिक जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने पुकारलेल्या बिऱ्हाड मोर्चात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनात राजू शेट्टी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

Swabhimani Shetkari Raju Shetti Agitation Dada Bhuse Ahead Home
Swabhimani Shetkari Sanghatana Thiyya Andolan GM Dada Bhuse Home


Previous Post

सावधान! सोसायटीतील लिफ्टविषयी हलगर्जीपणा नको; दिल्ली परिसरात ३ घटनांमध्ये ५ जणांचा मृत्यू

Next Post

आज आहे राष्ट्रीय स्टार्टअप दिवस… स्टार्टअप म्हणजे काय… ते कसे सुरू करतात…. घ्या जाणून सविस्तर…

Next Post

आज आहे राष्ट्रीय स्टार्टअप दिवस... स्टार्टअप म्हणजे काय... ते कसे सुरू करतात.... घ्या जाणून सविस्तर...

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group