India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयाची प्रजासत्ताक दिनानिमित्त अनोखी भेट; मिळणार ही विनामूल्य सुविधा

India Darpan by India Darpan
January 26, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रजासत्ताक दिनापासून सर्वोच्च न्यायालयाचे निकाल महाठीसह विविध २२ भाषांमध्ये दिले जाणार आहेत. भारतीय अनुसूचित भाषांमध्ये निकाल देण्याच्या या सेवेबाबत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी घोषणा केली आहे. सरन्यायाधीशांनी वकिलांसोबत बोलताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालय अनुसूचित भाषांमध्ये विनामूल्य उपलब्ध निकाल उपलब्ध करून देण्यासाठी गुरुवारपासून इलेक्ट्रॉनिक-सुप्रीम कोर्ट रिपोर्टस् (ई-एससीआर) प्रकल्प कार्यान्वित केले जाणार आहे. त्यात सध्या जवळपास ३४ हजार निकाल उपलब्ध आहेत. शिवाय त्यात शोध सुविधाही (सर्च) आहे. सध्या प्रादेशिक भाषांमध्ये १,०९१ निवाडे आहेत जे प्रजासत्ताकदिनी उपलब्ध केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अनुसूचित समाविष्ट भाषा
भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलगू, उर्दू, बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी, अशा २२ भाषांचा समावेश आहे.

प्रथमतः मराठीतील १४ निकाल
सरन्यायाधिशांनी सांगितले की, सध्यास्थितीत ओरियामध्ये २१, मराठीमध्ये १४, आसामीमध्ये ४, कन्नडमध्ये १७, मल्याळममध्ये २९, नेपाळीमध्ये ३, पंजाबीमध्ये ४, तमिळमध्ये ५२, तेलगूमध्ये २८ आणि उर्दूमध्ये ३ निकाल उपलब्ध आहेत,’ असे सरन्यायाधीशांनी सांगितले. ई-एससीआर प्रकल्पाचा भाग म्हणून हे निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर, मोबाइल ॲपवर आणि नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिडच्या (एनजेडीजी) जजमेंट पोर्टलवर उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Supreme Court Republic Day Gift 22 Languages


Previous Post

नंदुरबार जिल्ह्याचा स्वातंत्र्य लढ्यात असा आहे सहभाग; जाणून घ्या संपूर्ण इतिहास

Next Post

नाशिकचे ग्रुप कॅप्टन योगेश्वर कांदळकर यांना शौर्यचक्र; त्रिकूट दुर्घटनेतील शौर्यासाठी सन्मान

Next Post

नाशिकचे ग्रुप कॅप्टन योगेश्वर कांदळकर यांना शौर्यचक्र; त्रिकूट दुर्घटनेतील शौर्यासाठी सन्मान

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार पुष्प – तुमची प्रगती अखंडपणे चालू राहील

January 28, 2023

डोंबिवलीहून नवी मुंबई आता अवघ्या काही मिनिटांत; पारसिक बोगदा दोन्ही बाजूने खुला

January 27, 2023

अनेक दशके झाली तरी वेठबिगारीचं भूत आदिवासींच्या मानगुटीवर का आहे? त्याचं मूळ नक्की कशात आहे?

January 27, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आज अचानक धनलाभाची चिन्हे; जाणून घ्या, शनिवार, २८ जानेवारीचे राशिभविष्य (सोबत रथसप्तमीचे महत्व)

January 27, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २८ जानेवारी २०२३

January 27, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – विद्यार्थ्याचे उत्तर

January 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group