India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिकचे ग्रुप कॅप्टन योगेश्वर कांदळकर यांना शौर्यचक्र; त्रिकूट दुर्घटनेतील शौर्यासाठी सन्मान

India Darpan by India Darpan
January 26, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – झारखंडमधील त्रिकूट हिल्स रोपवेच्या दुर्घटनेत बचाव मोहिमेचे नेतृत्व करणारे आणि मूळचे नाशिकचे असलेले ग्रुप कॅप्टन योगेश्वर कांदळकर यांना शौर्यचक्र जाहीर करण्यात आले आहे. ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपतींनी शौर्य चक्र ग्रुप कॅप्टन योगेश्वर के कांदळकर यांना जाहीर केले. कांदळकर यांनी ३५ जणांचा जीव वाचविला होता. या बचाव ऑपरेशनमध्ये दाखवलेल्या अपवादात्मक धैर्याबद्दल आणि नेतृत्वाबद्दल त्यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे.

१० एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी ४८ यात्रेकरू त्रिकुट रोपवे मार्गात अडकले होते. इतर सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यावर भारतीय वायुदलाला पाचारण करण्यात आले.  या मोहिमेचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन कांदळकर यांच्याकडे देण्यात आले. Mi17 V5 हेलिकॉप्टरमधून हवाई दलाने ३५ जणांची यशस्वीरित्या सुटका केली. हेलिकॉप्टरद्वारे हाती घेतलेल्या सर्वात धाडसी बचावांपैकी ही एक मोहिम होती.

ग्रुप कॅप्टन कांदळकर हे नाशिकमध्ये जन्मलेले आणि वाढलेले आहेत. ओझर टाऊनशिप नाशिकमधील जीईएस एचएएल हायस्कूलमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण घेले. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथून पुढील शिक्षण घेतले. ते एक प्रतिष्ठित हेलिकॉप्टर पायलट आणि एक पात्र फ्लाइंग इंस्ट्रक्टर आहेत. प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचेही ते माजी विद्यार्थी आहेत.

Nashik Group Captain Yogeshwar Kandalkar Shaurya Chakra


Previous Post

सर्वोच्च न्यायालयाची प्रजासत्ताक दिनानिमित्त अनोखी भेट; मिळणार ही विनामूल्य सुविधा

Next Post

महिंद्रांनी घेतला डाळिंब खरेदीचा ‘आनंद’! डिजिटल रुपयात असे केले पेमेंट (बघा व्हिडिओ)

Next Post

महिंद्रांनी घेतला डाळिंब खरेदीचा ‘आनंद’! डिजिटल रुपयात असे केले पेमेंट (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

January 31, 2023
प्रातिनिधीक फोटो

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता भरावे लागणार एवढे परीक्षा शुल्क; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 31, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगर उत्पादक महेंद्र छोरिया यांना पुरस्कार

January 31, 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्कारार्थींना मिळणार आता एवढे लाख रुपये; राज्य सरकारची घोषणा

January 31, 2023

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

January 31, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज सावधगिरी बाळगावी; जाणून घ्या, बुधवार १ फेब्रुवारी २०२३चे राशिभविष्य

January 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group