India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कोर्टाने निकाल दिला पण हा तिढा वाढवला… आता व्हिप कुणाचा चालणार… शिंदे की ठाकरे?

India Darpan by India Darpan
May 11, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे सरकारला काही दिवसांसाठी संजीवनी मिळाली आहे. कोर्टाने व्हिपबाबात निर्णय दिल्याने आता सर्व सूत्र ही प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडे आली आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्व गेलं आहे. आत्तापर्यंत डिफेन्स मोडवर असलेले उद्धव ठाकरे आता अॅक्शन मोडमध्ये विधानभवनात दिसतील. मात्र, व्हिपच्या निमित्ताने पात्रता आणि अपात्रता यांची एक नवीन गुंतागुंत तयार होऊन तिढा वाढू शकतो, अशी भीती विधिज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर दहा महिन्यांनंतर निर्णय लागला. सर्वांची उत्सुकता ज्या निकालाकडे लागली होती, तो निकाल सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का देणारा ठरला. या पार्श्वभूमीवर आता विधी वर्तुळात चर्चेल पेव फुटले आहे. यात विधिज्ञ असीम सरोदे यांनी उडी घेत नव्या गुंतागुंतीविषयी भावना व्यक्त केली आहे. ‘आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय कोणतीही कालमर्यादा न देता लवकरात लवकर घ्यावा असं कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सांगितलं आहे. तेव्हा नेमकी कालमर्यादा कोणती यावर मतांतरे असू शकतात. मात्र याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.

आता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निष्पक्षपणे निर्णय घेण्याची एक संधी आहे. त्यांच्या राजकीय कारकीर्दीमधील हा महत्त्वाचा टप्पा असेल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा स्पष्ट आहे, त्यावर पुर्नविचार याचिका होऊ शकत नाही. कारण कायद्याच्या मुद्द्यांवर पुर्नविचार याचिका होऊ शकते,’ असे असीम सरोदे म्हणाले.

पुनर्विचार याचिका नाहीच
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा स्पष्ट आहे. त्यावर पुनर्विचार याचिका होऊ शकत नाही, असे देखील सरोदे यांनी स्पष्ट केले आहे.

सत्तासंघर्ष प्रकरणी न्यायालयाने दिलेला निर्णय कुठेच पोहविणारा नाही. एक कडक संविधानिक निर्णय देण्याचा प्रयत्न झाला असता तर निकाल एकमुखी नसताच. या निर्णयातून भारतीय संविधान हरवले आहे. न्याय-निर्णयाचे विश्लेषण करण्याचा हक्क प्रत्येकाने योग्य भाषा वापरून करावा.

— Asim Sarode (@AsimSarode) May 11, 2023

Supreme Court Order Whip Analysis


Previous Post

नवी मुंबईकरांना मोठा दिलासा… सुरू झाले सायबर पोलीस ठाणे… ऑनलाईन फसवणुकीला दाद मागता येणार

Next Post

हो, उद्धव ठाकरे नाराज झाले… शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं… सुप्रीम कोर्टाच्या निकालावरही म्हणाले…

Next Post

हो, उद्धव ठाकरे नाराज झाले... शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं... सुप्रीम कोर्टाच्या निकालावरही म्हणाले...

ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केले हे ट्वीट

June 5, 2023

नाशिक – मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; दोन जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

June 5, 2023

मुंबई विमानतळावर सहा कोटीचे १० किलो सोने केले जप्त, २ जण ताब्यात

June 5, 2023

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे लासलगावला ॲक्सिस बँकेचे तोडून नेलेले एटीएम रस्त्यावर फेकत चोरट्यांनी पळ काढला.

June 5, 2023

गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला… तब्बल १७०० कोटी पाण्यात… निकृष्ट दर्जाची पोलखोल

June 5, 2023
संग्रहित फोटो

शिंदे-फडणवीस सरकार आणि शिक्षण विभागाचा सावळागोंधळ; यंदापासून नवी आणि जुनी पाठ्यपुस्तके

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group