India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

प्रेमविवाह करणाऱ्यांनो सावधान! हे बघा, सर्वोच्च न्यायालय काय म्हणतेय…

India Darpan by India Darpan
May 22, 2023
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रेमविवाहातच सर्वाधिक घटस्फोट घडत असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निरीक्षणाने पुन्हा एकदा भारतीय विवाहसंस्थेवरील चर्चा सुरू झाली आहे.

प्रेमविवाह करा की घरच्यांच्या संमतीने लग्न करावे, हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. काही जण पारंपरिक पद्धतीने लग्न करून स्वत:चा संसार सुरू करतात. तर काही नेहमीचा मार्ग नाकारत प्रेमविवाहाला पसंती देतात. लग्न कशाही पद्धतीने केले तरी भांड्याला भांडे लागणे, रुसवे-फुगवे, भांडण-तंटा आणि एकमेकांना समजून घेणे या गोष्टी संसारात घडत असतात. बरेचदा लहानसहान वाददेखील विकोपाला जातात आणि संसार मोडकळीस येतो.

घटस्फोट घेणाऱ्यांमध्ये प्रेमविवाह तसेच पारंपरिक विवाह करणारे, आ दोहोचांही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर लव्ह मॅरेजमधूनच सर्वाधिक घटस्फोटाची प्रकरणे समोर येतात, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि संजय कारोल यांच्या खंडपीठासमोर एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना गवई यांनी हे मत मांडले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर एका वैवाहिक विवादाच्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यावेळी संबंधित दाम्पत्याचा विवाह हा लव्ह मॅरेज असल्याचे कोर्टासमोर सांगण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना जस्टिस गवई यांनी ‘लव्ह मॅरेजमधूनच घटस्फोटांची सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत’, अशी टिप्पणी केली आहे.

मध्यस्थीला पतीचा नकार
सर्वोच्च न्यायालयातील खटल्यामध्ये न्यायमूर्तींनी मध्यस्थी करण्याचा पर्याय सुचवला. मात्र, पतीला हा निर्णय मान्य नव्हता. त्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका निकालाच्या पार्श्वभूमीवर पतीच्या परवागनीशिवाय घटस्फोट दिला जाऊ शकतो, असे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले. त्यानंतर दोन्ही बाजूंना मध्यस्थी करण्याचे आवाहन या खंडपीठाने केले.

Supreme Court on Love Marriage


Previous Post

बलाढ्य अमेरिकाही कर्जाच्या गोत्यात… जगावर आर्थिक संकटाची छाया… ८३ लाख नोकऱ्या धोक्यात…

Next Post

१०वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी… विना परीक्षा पोस्टात नोकरी… इतक्या हजार जागा… आजच येथे करा अर्ज…

Next Post
संग्रहित फोटो

१०वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी... विना परीक्षा पोस्टात नोकरी... इतक्या हजार जागा... आजच येथे करा अर्ज...

ताज्या बातम्या

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

May 31, 2023

नाफेडच्या उन्हाळ कांदा खरेदीचा शुभारंभ… इतके मेट्रिक टन खरेदी करणार… डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नांना यश

May 31, 2023

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना फायर सेसबाबत मोठा दिलासा; झाला हा मोठा निर्णय

May 31, 2023

या मालिकेच्या सेटवर लागली आग, खोली जळून खाक

May 31, 2023

देवळा तालुक्यात भंगार गोदामाला आग… परिसरात धुराचे मोठे लोट (व्हिडिओ)

May 31, 2023

मालेगावात अवैधरित्या या औषधांची सर्रास विक्री; पोलिसांनी जप्त केला मोठा साठा (व्हिडिओ)

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group