India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सुकेश चंद्रशेखरने तुरुंगातूनच लिहिले जॅकलिन फर्नांडिसला प्रेम पत्र; काय आहे त्यात?

India Darpan by India Darpan
March 9, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रेम ही जगातली एक पवित्र भावना आहे. प्रेम व्यक्ती, स्टेटस, जागा बघून केलं जात नाही. आणि ही भावना जगातील कोणासाठीही अगदी सारखी असते. सेलिब्रिटी देखील यातून सुटलेले नाहीत. ही एवढी पार्श्वभूमी सांगण्याचं कारण म्हणजे नुकतंच समोर आलेलं एक प्रेमपत्र. या प्रेम पत्रात एवढं काय विशेष आहे, असं तुम्हाला वाटेल. पण हे प्रेमपत्र साधे नाही, तर खास आहे. कारण हे पत्र कारागृहातून लिहिलेलं आहे. मॉडेल आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला हे पत्र लिहिलं आहे सुकेश चंद्रशेखर याने. तेही थेट तिहार तुरुंगातून.

तुरुंगात असलेल्या सुकेशने होळीनिमित्त जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहिलं आहे. कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी सुकेश चंद्रशेखर सध्या तिहार तुरुंगात आहे. सुकेशशी संबंध असल्याच्या कारणावरून जॅकलिन देखील या प्रकरणी अडचणीत आली आहे. तिचीही बऱ्याचदा चौकशी झाली आहे. अशातच आता सुकेशने होळीनिमित्त जॅकलिनला पत्र लिहिलं आहे. या पत्राची सध्या चांगलीच चर्चा होते आहे.

जॅकलिन एक उत्तम व्यक्ती असून, तिच्या बेरंग आयुष्यात पुन्हा रंगांची उधळण करण्याचं वचन सुकेशने जॅकलिनला पत्रातून दिलं आहे. होळीनिमित्ताने सुकेशने हे पत्र लिहिले आहे. माझ्या जॅकलिनला रंगांच्या या सणानिमित्त खूप शुभेच्छा. या वर्षी मी माझ्या स्टाईलने तुझ्या आयुष्यातून निघून गेलेले रंग निश्चित परत आणेन तेही आधीपेक्षा जास्त प्रमाणात. ही माझी जबाबदारी आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, हे देखील तुला माहीत आहे, असं सुकेश या पात्रात म्हणतो. माय बेबी गर्ल, माय जॅकी” असेही तो तिला संबोधतो आहे. सुकेशने या पत्रात आपले कुटुंबीय आणि मित्रांनाही होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, सुकेशने जॅकलिनला तब्बल ५२ लाख रुपयांचा घोडा भेट दिला होता. तर ९ लाखांची पर्शियन मांजर गिफ्ट केली होती. २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा सध्या त्याच्यावर दाखल आहे. जॅकलिन, नोरा यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींना त्याने महागड्या भेटवस्तू देऊन जाळ्यात ओढले होते.

Sukesh Chandrashekhar Love Letter to Jacqueline Fernandez


Previous Post

पाकिस्तान कंगाल… माजी पंतप्रधान मालामॉल… पाक नागरिकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)

Next Post

कोल्हापूर मनपाची हद्दवाढ होणार का? लगतच्या ४२ गावांचे काय? मंत्री उदय सामंत म्हणाले…

Next Post

कोल्हापूर मनपाची हद्दवाढ होणार का? लगतच्या ४२ गावांचे काय? मंत्री उदय सामंत म्हणाले...

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group