नाशिक – पाथर्डी फाटा परिसरात गॅलरीतून उडी मारुन महिलेने केली आत्महत्या
नाशिक – पाथर्डी फाटा परिसरात गॅलरीतून उडी मारुन महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. मंगल केशव खोडसे (वय २७, स्कायलाईन अपार्टमेंट एकता ग्रीन व्हिसा जवळ) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी (दि.५) रात्री आठच्या सुमारास राहत्या घराच्या गॅलरीतून उडी मारल्याने महिलेच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली तिला गणेश वसंत लिलके यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. राम पाटील यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
आडगावला माळोदे मळ्यात श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने महिलेचा मृत्यु
नाशिक – आडगावला माळोदे मळ्यात श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने महिलेचा मृत्यु झाला. अलका भगवान बोरसे (वय ४१, माळोदे मळा) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी पावने नऊच्या सुमारास त्यांचा घरी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉ. पाटील यांनी मृत घोषीत केले. आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
समातनगरला दिवे चाळीत आत्महत्या
नाशिक – आगर टाकळी भागात समातनगरला दिवे चाळीत एकाने आत्महत्या केली. लखन उत्तम दिवे (वय ३२, दिवे चाळ समतानगर आगार टाकळी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुधवार (दि.५) दुपारी साडे तीनला घऱी किचन ओट्यावर चढून छताच्या लोखंडी ॲंगलला दोरीने गळफास घेउन आत्महत्या केल्याचे त्याचा भाउ रवि उत्तम दिवे यांनी उपनगर पोलिसांना कळविले त्यावरुन उपनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.