नाशिक – सातपूरला आयटीआय सिग्नलजवळ चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. निलेश राजेंद्र शेजवळ (वय ४४, चेहेडी शिवार) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी मृत निलेश राजेंद्र शेजवळ हे २७ डिसेंबरला दुपारी साडे चारच्या सुमारास दुचाकीवरुन सातपूरहून नाशिक रोडला जात असतांना आयटीआय सिग्नल जवळ त्यांच्या गाडीला चार चाकीने धडक दिल्याने त्यांना त्यांचा भाऊ कुंदन शेजवळ यांनी २ जानेवारीला आडगाव मेडीकल कॉलेजला दाखळ केले होते. बुधवारी (दि.५) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास डॉ संजय मानेकर यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.