मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘अप्रतिम मीडिया’च्यावतीने बीट जर्नालिझमसाठी दिला जाणाऱ्या ’चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२२’ साठी संपूर्ण राज्यातून विविध माध्यम प्रकारांच्या प्रतिनिधींनी नामांकन केले होते. २०२०-२०२१ या दोन वर्षांमध्ये संबंधित पत्रकाराने केलेले विशेष वृत्तांकन, विश्लेषण व पुरस्कार निवड प्रक्रियेचा भाग म्हणून वेब संवादाद्वारे एखाद्या समस्येची केलेली मांडणी इत्यादी निकष लावण्यात आले होते. त्यानुसार राजकारण ते पर्यावरण वृत्त गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशा श्रेणीचे पुरस्कार घोषित करण्यात येतआहेत, अशी माहिती अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ. अनिल फळे, संचालिका सौ.प्रीतम फळे, निमंत्रक सर्वश्री राहुल शिंगवी, रणजीत कक्कड, मानस ठाकूर, जगदीश माने, निशांत फळे यांनी दिली. नामांकन केलेल्या प्रत्येक पत्रकारास नामांकन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पुरस्कार विजेत्यांना मुंबई येथे लवकरच होणाऱ्या भव्य वितरण समारंभात सन्मानित करण्यात येईल.
यंदाचे पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे आहेत.
o) जीवन गौरव –
प्रकाश नथुजी कथले(वर्धा ), हेमंत जोशी (मुंबई ) योगेश त्रिवेदी ( मुंबई ).
१ ) टीव्ही न्यूज चॅनेल टीम लीडर –
आशुतोष पाटील, (संपादक, न्यूज१८ लोकमत, मुंबई ).
२ ) माध्यम उद्योजकता व संपादकीय नेतृत्व –
मदन चंद्रभान काळे (शिरूर, जि. पुणे (संवाद लाईव्ह टीव्ही, साप्ताहिक संवाद वाहिनी).
३ ) साहित्य संवाद गट –
महाराष्ट्र मित्र, पुणे (साहित्य संवाद उपक्रम) आणि मुकुंद अर्जुनराव बाविस्कर ( नाशिक -मुक्त पत्रकार)
४ ) पर्यावरण वृत्त गट –
प्रशांत सिनकर (ठाणे,महाराष्ट्र टाईम्स), महेश दिगंबर जोशी (औरंगाबाद, दिव्यमराठी) व दिनकर शिंदे ( गेवराई, जि.बीड – पार्श्वभूमी)
६ ) वने व इको टूरिझम वृत्त –
अरुण तम्मडवार ( किनवट, जि. नांदेड – पुढारी) व श्यामकुमार पुरे ( सिल्लोड – लोकमत) आणि राजेंद्र आसाराम भोसले, कन्नड, जि.औरंगाबाद (मुक्त पत्रकार)
७ ) विकास वृत्त –
शाश्वत गुप्ता रे ( पणजी, गोवा -मुक्त पत्रकार) व विलास ओव्हाळ ( पणजी, गोवा पुढारी)
८ ) स्थानिक पर्यटन वृत्त –
मकरंद मधुकर जाधव ( श्रीवर्धन, जि.रायगड – दैनिक वादळवारा) व नितीन मोरे ( कंधार, जि.नांदेड – आदर्शगावकरी) आणि दादासाहेब घोडके, पैठण (एमसीएन न्यूज)
९ ) उद्योग / व्यापारवृत्त –
चंद्रन महादेवन अय्यर, पुणे (मासिक कार्पोरेट टायकून्स)
१० ) कला-संस्कृती वृत्त गट –
श्रीकांत गोपाळराव सराफ ( औरंगाबाद – दिव्य मराठी)
११ )कृषी वृत्त –
राहुल दत्तात्रय कुलकर्णी, गंगापूर(सकाळ – अग्रोवन) व पूनम सुनील सकपाळ ( नवी मुंबई , लोकसत्ता) व सदाशिव खेमचंद फुले, ( सिल्लोड – दिव्य मराठी) आणि विजय एकनाथराव चौधरी ( खुलताबाद, महाराष्ट्र टाईम्स)
१२ ) शैक्षणिक वृत्त –
महालसिंग भिसे ( गंगाखेड, जि.परभणी – दैनिक लोकप्रश्न) व विजय कुलकर्णी ( परभणी – दैनिक लोकनेता)
१३ ) आरोग्य वृत्त –
जान्हवी प्रसाद पाटील, ठाणे (महाराष्ट्र टाईम्स) व रमाकांत फकीरा पाटील ( नंदुरबार, लोकमत) व फिरोज बशीर पिंजारी ( खोपोली, दैनिक कोकण प्रजा) आणि मनीषा अभिजीत हिरप( औरंगाबाद –
मासिक -हेल्दी सोसायटी)
१४ ) ग्रामीण विकास वृत्त –
नवनाथ गोपीनाथ इधाते ( फुलंब्री, जि.औरंगाबाद -सकाळ) व उमेश रमेश अलोणे ( अकोला, विदर्भ -एबीपी माझा) आणि विश्वास आरोटे ( अकोले जि.अहमदनगर – दैनिक गावकरी) आणि
सुनील ढेपे, (उस्मानाबाद -उस्मानाबाद लाइव्ह डॉट काम)
१५ )सहकार वृत्त –
शफिक मोहम्मद बागवान ( श्रीरामपूर, दैनिक राष्ट्र सह्याद्री) व सिद्धेश्वर केशुबा गिरी ( सोनपेठ , दैनिक एकमत)
१६ ) पत्रकारिता अध्यापन गट –
डॉ. संध्या मोहिते, औरंगाबाद (डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ )
१७ ) स्थानिक विकास वृत्त –
कन्हैया सत्यनारायण खंडेलवाल ( हिंगोली – एन डी टीव्ही ) व पल्लवी राजेंद्र नाईक, ( सोलापूर, ९२.७ बिग एफएम) आणि मकरंद बांगर, हिंगोली (मुक्त पत्रकार)
१८ ) राजकीय वृत्त –
उन्मेष गुजराथी ( मुंबई – स्प्राउटस डॉट कॉम) व भास्कर लोंढे ( नागपूर – लोकशाही वार्ता) व प्रकाश दयाराम हांडे (न्युज ३४, चंद्रपूर ) सचिन सुहासराव काटे ( हैद्राबाद – इटीव्ही भारत)
१९ ) सामाजिक वृत्त –
देवेंद्र त्रिंबकराव भुजबळ ( पुणे, न्यूज स्टोरी टुडे) व सचिन रावसाहेब बडे ( औरंगाबाद लोकशाही टीव्ही)
२० ) शासकीय योजना वृत्त –
मोसिन शेख (मॅक्स महाराष्ट्र, औरंगाबाद )
२१ ) स्थानिक स्वराज्य संस्था वृत्त –
उन्मेष देशपांडे ( औरंगाबाद, महाराष्ट्र टाईम्स) व मनोज कुलकर्णी ( नाशिक – टीव्ही ९) व कैलास उत्तम ढोले, अहमदनगर,(मुक्त पत्रकार)
२२ )युवा क्षेत्र वृत्त –
हरीश राजेंद्र शर्मा ( औरंगाबाद , सकाळ)
२३ ) धार्मिक क्षेत्र वृत्त –
हनुमंत चिटणीस, पाथरी, जि.परभणी (मुक्त पत्रकार)
२४ ) आर्थिक वृत्त –
विलास माणिकराव बडे ( मुंबई, न्यूज १८ टीव्ही) व अनिकेत अरविंद पेंडसे ( मुंबई, लोकमत ऑनलाईन)
२५ ) गुन्हेगारी वृत्ते –
नरेश डोंगरे (नागपूर , लोकमत)
२६ ) प्रेस फोटोग्राफी –
रवी खंडाळकर व मनोज पराती (दिव्य मराठी) आणि विजय भावसार ( नांदगाव, जि.नाशिक )
२७ ) ग्राफिक डिझाईनिंग पत्रकारेतर गट –
महेश सोनाजी विसपुते (औरंगाबाद ).