India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

स्टेट बँकेकडून चक्क रिझर्व्ह बँकेची फसवणूक… अखेर गुन्हा दाखल… काय आहे हा प्रकार

India Darpan by India Darpan
May 21, 2023
in Short News
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून चक्क रिझर्व्ह बँकेची फसवणूक करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. आग्रा येथील छीपीटोला येथील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेने रिझर्व्ह बँकेकडे पैसे पाठवले होते. त्यात १००च्या सहा नोटा बनावट निघाल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया क्लेम सेक्शन, कानपूरच्या वतीने रकाबगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बँकेतील अज्ञात कर्मचाऱ्यांना आरोपी करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या प्रकारात स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही बनावट नोटा ओळखू आल्या नाहीत. तसेच, नोटा तपासण्यासाठी मशिन्सही बसविण्यात आल्या आहेत. असे असतानाही रिझर्व्ह बँकेकडे बनावट नोटा गेल्या कशा असा प्रश्न उपस्थित होत आहे. अखेर रिझर्व्ह बँकेत तपासादरम्यान बनावट नोटा पकडण्यात आल्या आहेत.

इतर करन्सी बँकांच्या करन्सी चेस्ट शाखांमधून कानपूर रिझर्व्ह बँकेत नोटा पोहोचतात. रिझर्व्ह बँकेच्या क्लेम सेक्शन आणि इश्यू डिपार्टमेंटच्या मॅनेजरने याप्रकरणी रकाबगंज पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, विविध करन्सी चेस्टमधून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा येतात. एप्रिल महिन्यात आग्रा स्टेट बँकेच्या करन्सी चेस्टमधून पाठवलेल्या १०० रुपयांच्या सहा नोटा बनावट असल्याचे समोर आले आहे.

बँकींग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते या प्रकरणात मोठा निष्काळजीपणा झाला आहे. बनावट नोटा शोधण्यासाठी बँकांकडे आधीच भरपूर संसाधने आहेत. यंत्रे बसवली आहेत, त्यामुळे बनावट नोटा लगेच पकडल्या जातात. असे असूनही कर्मचाऱ्यांना नोटा ओळखता आल्या नाहीत. याचे एक कारण म्हणजे केवळ २ हजार आणि ५०० ​​च्या नोटांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. १०० आणि ५० सारख्या छोट्या नोटा जमा करताना कर्मचारी फारसे लक्ष देत नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

State Bank of India SBI cheating RBI


Previous Post

राजीव गांधींचा आज स्मृतीदिन… राहुल गांधींनी शेअर केला अतिशय भावनिक व्हिडिओ

Next Post

नाशिकरोडचा अट्टल गुन्हेगार घोड्या तोरवणेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; केली ही मोठी कारवाई

Next Post

नाशिकरोडचा अट्टल गुन्हेगार घोड्या तोरवणेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; केली ही मोठी कारवाई

ताज्या बातम्या

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २४०, तर जखमींची संख्या १ हजारावर

June 3, 2023

रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?

June 3, 2023

ड्रायव्हर आजारी पडल्याने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस (व्हिडिओ)

June 3, 2023

शरद पवार-गौतम अदानी भेटीने उंचावल्या सर्वांच्या भुवया; ही आहे बातमी मागची बातमी

June 3, 2023

झंझटच मिटली… कोरड्या हवामानात आणि अत्यल्प पाण्यात टिकणार ही वनस्पती.. शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

June 3, 2023
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमान तिकीटावर ४० टक्के, हॉटेल बुकींग्जवर ६० टक्के सूट; असा घेता येईल लाभ

June 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group