सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अबब! स्टेट बँकेने अदानी समुहातील कंपन्यांना दिले आहे एवढे अफाट कर्ज; खुद्द बँकेनेच दिली माहिती

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 2, 2023 | 8:14 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अदानी उद्योग समूहाचे नाव कथित आर्थिक गैरव्यवहारात पुढे आल्यामुळे आता चहुबाजुंनी झडती सुरू झाली आहे. गुंतवणुकदारांचे टेंशन तर वाढलेच आहे, पण अदानी उद्योग समूहाला कर्ज देणाऱ्या बँकांचीही छाती आता धडधडायला लागली आहे. कारण तब्बल २१ हजार कोटी रुपयांचं कर्ज अदानी उद्योग समूहाच्या कंपन्यांवर आहे, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

हिंडेनबर्गने अदानींच्या नावाचा गैरव्यवहारात उल्लेख करताच या उद्योग समूहाशी जुळलेल्या सर्वांचेच टेंशन वाढले. दोनच दिवसांत अदानीने मार्केटमधून एफपीओ गुंडाळला. त्यामुळे अधिकच गोंधळ उडाला. गुंतवणूकदारांनी तर आपले पैसे राहतील की जातील, अशी भितीच व्यक्त केली. अर्थात कंपनीचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी स्वतः गुंतवणुकदारांना निश्चिंत राहण्याचा सल्ला दिला आहे. पण आता स्टेट बँक ऑफ इंडियाने अदानींच्या कंपन्यांवर असलेल्या कर्जाचा आकडा सांगून आणखी एक धक्का दिला आहे.

अदानी समूहाच्या कंपन्यांना २.६ बिलीयन डॉलर अर्थात २१ हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याचे एसबीआयने सांगितले आहे. एसबीआयने दिलेल्या आकड्यांमध्ये परदेशी युनिट्सच्या २०० मिलीयन डॉलरचाही समावेश आहे. यात पंजाब नॅशनल बँकेने अदानी उद्योग समूहाला ७ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले असून यातील अडीच हजार कोटी रुपये विमानतळ व्यवसायाशी संबंधित आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

परतफेड होत आहे
स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी अदानी उद्योग समूहाच्या कर्ज परतफेडीत कुठलीही अडचण नसल्याचे सांगितले आहे. समूहाच्या सर्व कंपन्या नियमीत कर्ज फेडत आहेत. बँकेने दिलेल्या कर्जात आतापर्यंत तरी कुठलीही समस्या उद्भवलेली नाही, असेही ते म्हणाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांकडून अदानी उद्योग समूहाच्या कर्जांचा सद्यस्थिती अहवाल मागवला आहे.

बँकांवरही प्रश्न
अदानी उद्योग समूहाची मार्केटमधील स्थिती खराब होत असताना त्यांना कर्ज देणाऱ्या बँकांबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाला ही माहिती द्यावी लागली. अदानी समूहाने हिंडेनबर्गचे सर्व आरोप फेटाळले असले तरीही कर्ज देणाऱ्या बँकांवर प्रश्नचिन्ह नक्कीच उपस्थित झाले आहे.

State Bank of India Adani Group Companies Loan
Finance Banking

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

औरंगाबाद विधान परिषद निवडणुकीचाही निकाल लागला; बघा, कुणी कुणाला दिले धोबीपछाड

Next Post

अदानींचे पाय खोलात! हिंडेनबर्गनंतर आता आला हा अहवाल; बघा, अदानींविषयी त्यात काय म्हटलंय?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

PETROL PUMP
संमिश्र वार्ता

टँकरमधून होणारी इंधन चोरी….पेट्रोल डीलर्स असोसिएशनने चोरीचा असा केला पर्दाफाश

सप्टेंबर 15, 2025
Untitled 19
स्थानिक बातम्या

नाशिकच्या केंब्रिज स्कूलमध्ये बॅाम्ब…शाळा प्रशासनाने दिली ही माहिती

सप्टेंबर 15, 2025
accident 11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया अपघातात भरधाव वाहनांनी दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

सप्टेंबर 15, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
महत्त्वाच्या बातम्या

पराभवानंतरही पाकिस्तान संघाला मिळाले इतके कोटी….संजय राऊत यांनी सांगितला धक्कादायक आकडा

सप्टेंबर 15, 2025
VO7rnvQq 400x400 e1757903064573
राष्ट्रीय

संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण खरेदी नियामावलीला दिली मंजुरी…हा होणार फायदा

सप्टेंबर 15, 2025
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन 5 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन…आज शपथविधी

सप्टेंबर 15, 2025
Untitled 7
संमिश्र वार्ता

समृध्दी महामार्गावर खिळे? अखेर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

सप्टेंबर 15, 2025
Next Post
Gautam Adani1

अदानींचे पाय खोलात! हिंडेनबर्गनंतर आता आला हा अहवाल; बघा, अदानींविषयी त्यात काय म्हटलंय?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011