मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) लवकरच नवे अध्यक्ष भेटणार आहेत. सध्या सौरभ गांगुली अध्यक्ष आहेत. माजी वेगवान गोलंदाज रॉजर बिन्नी हे नवे अध्यक्ष होऊ शकतात. बिन्नी हे १९८३च्या विश्वचषक विजेत्या संघाचा महत्त्वाचा भाग होते. खजिनदार अरुण धुमाळ यांच्या जागी भाजपचे आमदार आशिष शेलार यांची वर्णी लागू शकते. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह हे त्यांच्या पदावर कायम राहणार आहेत.
एएनआयने ट्विटमध्ये काही छायाचित्रांसोबत लिहिले आहे की, ‘भारताचे माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची जागा घेण्याची शक्यता आहे. जय शहा हे सचिवपदी कायम राहतील, तर अरुण धुमाळ यांच्या जागी महाराष्ट्र भाजपचे आमदार आशिष शेलार खजिनदार असतील.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच BCCI च्या सर्व पदांसाठी निवडणुका होणार आहेत. BCCI अध्यक्षपदासाठी १८ ऑक्टोबर रोजी मुंबईत निवडणूक होणार आहे. बीसीसीआयमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि कोषाध्यक्ष या पदांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक लढवण्यासाठी या पदांसाठी ११ आणि १२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरायचे आहेत.
https://twitter.com/ANI/status/1579714551972786181?s=20&t=93MtdcBncGgxdfYTvICnuA
Sports Cricket BCCI Election New President
Roger Binny Sourav Ganguly Ashish Shelar Jay Shah