India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

इंडिया दर्पण विशेष लेख – तब्बल ५०० वर्षांची परंपरा असलेली मुल्हेरची रासक्रीडा

India Darpan by India Darpan
October 8, 2022
in साहित्य व संस्कृती
0

पाचशे वर्षांची परंपरा असलेली
मुल्हेरची रासक्रीडा

उद्धव महाराज मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे ज्यांना मुलबाळ होत नाही असे भाविक येथे यादिवशी येऊन नवस करतात व मुलगा किंवा मुलगी झाले की त्यांना गोपीच्या पेहराव्यात येथे आणतात अशा अनेक गोपिका या ठिकाणी जमतात. मंदिरासमोरच्या मैदानावर ही पारंपरिक रासक्रीडा साजरी केली जाते.या रासक्रिड़ेच्या प्रसंगी अनेक प्रथांचे व परंपराचे पालन केले जाते. उत्तर भारतातील वृंदावन प्रमाणेच नाशिक जिल्ह्यात देखील दरवर्षी श्रीकृष्णाची रासक्रीडा साजरी केली जाते.थोडीथीडकी नाही तर गेल्या ४८२ वर्षांपासून ही रासक्रीडा पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते.

विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

नवरात्रोसव संपल्या नंतर येणार्या आश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला सटाणा तालुक्यातील मुल्हेर येथे हा उत्सव साजरा केला जातो. मुल्हेर येथील उद्धव महाराजांचे मंदिर प्रसिद्ध आहे या मंदिरासमोरच्या मैदानावर ही पारंपरिक रासक्रीडा साजरी केली जाते.या रासक्रिड़ेच्या प्रसंगी अनेक प्रथांचे व परंपराचे पालन केले जाते. या रासक्रिड़ेसाठी विशिष्ट प्रकारचे चक्र तयार करतात. त्याला ‘मंडळ’असे म्हणतात. केळची पाने, झेंडूची व इतर फुले, शोभेच्या वस्तू यांपासून हे गोलाकार चक्र तयार करतात.

सुमारे २८ फुट व्यासाचे केळीच्या पानांनी आणि झेंडूच्या फुलांनी सजविलेल्या हे वैशिष्ट्यपूर्ण चक्र आकाशात चंद्र आणि सूर्य दोघांची उपस्थिती असतांना भाविक मंडळी रास स्तंभावर चढवितात. या वेळला ‘संपत वेळ’ असे म्हणतात. त्यानंतर ‘उद्धव महाराज की जय’ असा जयघोष होऊन रासचक्र स्तंभावर फिरविण्यास सुरुवात होते. वृंदावनात श्रीकृष्ण आणि गोपिका अशा मंडळाखाली रासक्रीडा खेळत असत,असे मानले जाते. त्या मंडळाचे प्रतीक म्हणून हे रासचक्र दरवर्षी तयार करण्यात येते. त्यानंतर रात्री ८ वाजता देवघरापासून श्रीकृष्ण, राधा व गोपिका यांची सवाद्य मिरवणूक काढतात. त्यावेळी ‘राधा कृष्ण’, ‘जय कुंजविहारी’, ‘मुरलिधर गोवर्धनधारी’ या घोषणांनी वातावरण दुमदुमून जाते.

रासचक्र चढविल्यानंतर रात्री मानाच्या घराण्यातील एका मुलास कृष्ण, तर इतरांना राधा, गोपिका बनवून जयघोषात तसेच टाळ, पखवाजच्या गजरात रामशाळेतून समाधी मंदिरापर्यंत मिरवणूक काढली जाते. उद्धव महाराजांच्या मंदिरासमोरच्या मैदानावर उभारलेल्या रासमंडलाखाली राधा, कृष्ण व गोपिकांना बसवून रात्रभर रासक्रीडेची भजने म्हटली जातात. या भजनांना देखील परंपरा आहे. रात्री दहा वाजेपासून गायनाला सुरुवात होते. यावेळी अहिराणी, हिंदी, ब्रज, गुजराथी आणि संस्कृत भाषेतील एकूण १०५ भजनं म्हटली जातात. श्रीकृष्ण व राधा यांच्या प्रेमाचे व विरहाचे तसेच भक्तीचे वर्णन असलेली ही भजने संत कबीर, नरसिंह स्वामी, यांनी रचलेली आहेत.

इ. स. १६४० पासून आजतागायत म्हणजेच ४८२ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. रासक्रीडा भजनात शास्त्रीय संगीतातील १५ रागांचे गायन होते. त्यात प्रामुख्याने ‘सारंग’, ‘तोडी’, ‘कल्याण’, ‘कानग’, ‘केदार’, ‘जेजेवंती’, ‘मालकंस’, ‘रामकली’, ‘भूप’, ‘विभग’, ‘नट’, ‘बिलावर’ आदी प्रचलीत राग आहेत. तसेच ‘समिरी’, ‘परज’, ‘मालगौडा’ आदी दुर्मिळ राग देखील भजन गायनात समाविष्ट केले जातात. भजनातील झांज आकाराने आणि वजनाने मोठे असतात. उद्धव महाराज मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे ज्यांना मुलबाळ होत नाही असे भाविक येथे यादिवशी येऊन नवस करतात व मुलगा किंवा मुलगी झाले की त्यांना गोपीच्या पेहराव्यात येथे आणतात अशा अनेक गोपिका या ठिकाणी जमतात. तसेच ही रासक्रीडा अनुभवण्यासाठी नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, पुणे यासह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश येथून भाविक येतात.

इ. स. पूर्वी महाभारत कालीन राजा मयुरध्वजास भगवान श्रीकृष्णांनी आपल्या दिव्य चक्षूंनी रासक्रीडेचे दर्शन घडवले. तेव्हापासून मुल्हेर येथे अश्विन पौर्णिमेस रासक्रीडा उत्सव साजरा केला जातो असे म्हणतात. श्री उद्धव महाराजांचे गुरू श्री काशीराज महाराज यांनी १६४० साली या रासक्रीडेची पुनर्रचना केली असे म्हणतात. तेव्हापासून आजतागायत ४८२ वर्षां पासून हा रासक्रीडा उत्सव मुल्हेर येथे सुरु आहे. संपूर्ण देशांत केवळ वृदांवन, मथुरा व महाराष्ट्रातील मुल्हेर येथे रासक्रीडा उत्सव हा साजरा केला जातो असे म्हणतात. सकाळी ८:३० वाजता रासचक्र स्तंभावरून उतरवून कार्यक्रमाची सांगता होते. यानिमित्ताने येथे मोठी यात्रा भरते.

(छायाचित्र व संदर्भ : सौजन्य विकिपीडिया)
Special Article on Mulher Raskrida by Vijay Golesar
500 Years Tradition


Previous Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा ऑफिसमधून बायकोला फोन करतो

Next Post

असा असेल तुमचा आगामी आठवडा; जाणून घ्या, ८ ते १६ ऑक्टोबरचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा आगामी आठवडा; जाणून घ्या, ८ ते १६ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

February 2, 2023

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

February 2, 2023

‘उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजूंंना अपात्र ठरवा’, वकीलांच्या संघटनेची हायकोर्टात धाव

February 2, 2023

अर्थसंकल्प नेमका कसा आहे? मंत्री रामदास आठवलेंचा व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्हीही बघा…

February 2, 2023

नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group