इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री अनिका विजय विक्रमण तिच्या फोटोंमुळे खूप चर्चेत असते. अलीकडे, अनिकाने सोशल मीडियावर तिचे सुजलेले डोळे आणि जखम दर्शविणारी छायाचित्रे शेअर केली आहेत. या फोटोंनी तिच्या चाहत्यांना गोंधळात टाकले आहे. ही छायाचित्रे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनिकाची ही अवस्था कशी झाली असा प्रश्न यूजर्सच्या मनात सतत उपस्थित होत आहे.
दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री अनिकाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत. ज्यामध्ये तिने तिच्या डोळ्यांवर तसेच चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमांसह दिसत आहे. डोळ्यांची अवस्था अशी आहे की, चाहतेही घाबरले आहेत. फोटो शेअर करून अनिकाने सांगितले की, तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्यासोबत अशी अट घातली आहे.
अनिकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्यासोबत जे घडले ते सोडले तरीही मला सतत धमक्यांचे फोन येत आहेत. माझ्या कुटुंबावर सातत्याने चिखलफेक होत आहे. तिने पुढे लिहिले की, ‘मी दुर्दैवाने अनूप पिल्लई नावाच्या व्यक्तीला डेट करत होते, पण त्याने माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला. त्याच्यासारखा माणूस मी पाहिला नाही. एवढे करूनही तो मला धमक्या देत आहे. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की तो असे कधी करेल.
अनिकाने पुढे लिहिले की, ‘जेव्हा त्याने मला पहिल्यांदा मारहाण केली तेव्हा आम्ही चेन्नईत होतो. मग तो माझ्या पाया पडून रडू लागला. त्याला क्षमा करुन मी मूर्खपणा केाृला. बंगळुरूला असताना दुसऱ्यांदा मारहाण झाली. त्यानंतर मी पोलिसांत तक्रार केली. मात्र त्याने पोलिसांना पैसे देऊन मॅनेज केले. त्यांनी आम्हाला आपापसात प्रकरण मिटवायला सांगितले. यामुळे त्याला पुन्हा माझ्यावर हल्ला करण्याची हिंमत मिळाली.
https://www.instagram.com/p/CpZ9q3sPYvr/?utm_source=ig_embed&ig_rid=9f1c0836-b1f6-44d0-af23-d4c169394cfc
South Actress Anicka Vickramman Share Shocking Photos