India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सीबीआयच्या अटकेनंतर मनीष सिसोदिया यांचा दिल्लीच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा

India Darpan by India Darpan
February 28, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

सत्येंद्र जैन यांचाही राजीनामा
नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अबकारी धोरण प्रकरणात घेरलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर अगोदर तुरुंगात असलेले सत्येंद्र जैन यांनी राजीनामा दिला आहे. रविवारी आठ तास चौकशी केल्यानंतर सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती. आपच्या या दोघांचा राजीनामा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्विकारला आहे. सिसोदिया यांच्याकडे १८ विभाग होते.

सिसोदिया यांच्यावर हे आहे आरोप
सिसोदिया आणि इतर लोकसेवकांवर मद्य परवानाधारकांना अनुचित फायदा देण्याच्या उद्देशाने सक्षम अधिकाऱ्याच्या मंजुरीशिवाय उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२ लागू केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या धोरणाला महसूल निर्मितीचे मॉडेल म्हटले जात होते तर भाजपने या धोरणावर कोट्यवधींचे घोटाळे झाल्याचा आरोप केला आहे. नवीन धोरण लागू झाल्यानंतर दिल्लीत लोकांना स्वस्तात दारू मिळत होती. पण त्यामुळे या धोरणाबाबत गदारोळ वाढत गेला आणि प्रकरण सीबीआयपर्यंत पोहोचले. नवीन उत्पादन शुल्क धोरणाबाबत मुख्य सचिव नरेश कुमार यांना तपासात त्रुटी आढळल्या आहेत, ज्याच्या आधारे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. नवीन उत्पादन शुल्क धोरणासंदर्भात शुक्रवारी सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह अगोदर ३१ ठिकाणी छापे टाकले होते. यात अनेक कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली होती.


Previous Post

जम्प.ट्रेड (Jump.trade) कडून पहिला रेसिंग मेटाव्‍हर्स गेम रॅडडीएक्‍स लाँच

Next Post

महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल निवडणूक प्रकरण; अखेर नऊ महिन्यानंतर गुन्हा दाखल

Next Post

महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल निवडणूक प्रकरण; अखेर नऊ महिन्यानंतर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group