सिन्नर – तालुक्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे. आरोग्य केंद्र अंतर्गत ताप सर्दी आणि खोकला या रुग्णाची संख्या वाढली आहे.
यात वयोवृद्धांबरोबर लहान मुलांनाही त्रास जाणवतोय आहे. श्वसनाचा विकार असणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तींना पाणी, ऊन, थंडी अशा वातावरणाचा जास्तच त्रास जाणवत आहे. सोबतच लहान मुलांना सर्दी, खोकला होण्याची जास्त शक्यता आहे. सर्दी, खोकला आणि ताप या आजारामुळे रुग्णालयातव खाजगी दवाखान्यात गर्दी दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात, अनेक खेडोपाडी भागात ढगाळ वातावरण आहे. त्यातच मागील काही आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यात ऊन सावलीचा खेळ सुरूच आहे. या सर्व वातावरणाच्या बदलामुळे जास्त प्रमाणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. सिन्नर शहरासह ग्रामीण भागात सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. सरकारी रुग्णालयामह खासगी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे. त्याचबरोबर कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने लक्षणे दिसताच रुग्णालयात संपर्क करावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. वर्षा लहाडे, नगरपरिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. लहू पाटील, डॉ. वैभव गरुड आदींसह तालुक्यातील आरोग्य केंद्राचे अधिकारी, यांनी केले आहे.
रुग्णालयांत ओपीडी वाढली
शासकीय रुग्णालयासह खासगी दवाखान्यामध्येही सर्दी, ताप, खोकला जाणवल्यास तत्काळ डॉक्टरकडे जाण्याचा लोकांचा कल वाढला सर्दी, खोकल्पाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे दवाखान्यांच्या ओपीडीमध्ये सर्दी-खोकला, तापाने रुग्ण अधिक प्रमाणात रुग्ण दिसत आहेत.