सिन्नर- आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंब आनंदी राहते, आपले जीवन अनमोल आहे. आरोग्याची काळजी घ्या. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे. गरजूंना मदतीचा हात द्या, असे मत पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
येथील नगरपालिकेसमोरील चौदाचौक वाड्यात ‘साईतीर्थ मेडिकल’ च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख होते. व्यासपीठावर पंचायत समितीचे गटनेते विजय आप्पा गडाख, माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी राजेश गडाख, उपाध्यक्ष दौलतराव मोगल, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, डॉ. दत्तात्रय गडाख, नगराध्यक्ष किरण डगळे, आर्किटेक्ट महेंद्र तारगे, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी.देशमुख, मुख्याध्यापक रघुनाथ एरंडे, पर्यवेक्षक माधव शिंदे उपस्थित होते.
कोरोनाची रुग्ण संख्या जरी आटोक्यात येत असली तरी कोरोना मात्र पूर्णपणे गेलेला नाही. हात धुणे, मास्क वापरणे सारख्या गोष्टी छोट्या वाटत असल्या तरी आरोग्याच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. योगासने, प्राणायाम आदी व्यायामाच्या सवयी अंगिकाराव्या. एरंडे परिवार यांनी सुरू केलेल्या साईतीर्थ मेडिकलच्या माध्यमातून समाजाची सेवा घडेल असा विश्वास डॉ.तांबे यांनी व्यक्त केला. राजेश गडाख यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक रघुनाथ एरंडे म्हणाले की शहरासह ग्रामीण भागातील जनतेला सेवा देण्याच्या उद्देशाने ना नफा ना तोटा या तत्त्वावर सवलतीच्या दरामध्ये औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. कोरोना सारख्या महाभयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील जनतेला योग्य व तत्पर सेवा देण्याला प्राधान्य दिले जाईल असेही ते म्हणाले. याप्रसंगी मेडिकलचे संचालक प्रभंजन एरंडे, पायल एरंडे, सुरेखा एरंडे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. मनोज सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. एस.बी.देशमुख यांनी आभार मानले.