रेल्वे द्वारा प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी या विशेष गाड्या धावणार आहे..
1) 05017 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर विशेष (दैनिक) दि. १.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल.
05018 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (दैनिक) दि. १.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल.
2) 05102 लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा विशेष (दर गुरुवारी) दि. ८.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल.
05101 छपरा- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (दर मंगळवार) दि. ६.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल.
3) 02598 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- गोरखपूर विशेष अतिजलद (दर बुधवारी) दि. ७.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल.
02597 गोरखपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष अतिजलद (दर मंगळवार) दि. ६.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल.
4) 02741 वास्को दी गामा -पटना विशेष अतिजलद (दर बुधवार) दि. ३०.०६.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल.
02742 पटना -वास्को दी गामा विशेष अतिजलद (दर शनिवार) दि. ३.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल.
5) 07323 हुबली -वाराणसी विशेष अतिजलद (दर शुक्रवार) दि. २५.०६.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल.
07324 वाराणसी-हुबली विशेष अतिजलद (दर रविवार) दि. २७.०६.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल.
6) 06229 मैसूर -वाराणसी विशेष अतिजलद (दर मंगलवार, गुरुवार) दि. २९.०६.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल.
06230 वाराणसी -मैसूर विशेष अतिजलद (दर गुरुवार, शनिवार) दि. १.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल.
7) 06502 यशवंतपुर-अहमदबाद विशेष अतिजलद (दर रविवार) दि. २७.०६.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल.
06501 अहमदबाद-यशवंतपुर विशेष अतिजलद (दर मंगळवार) दि. २९.०६.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल.
पुणे येथून सुटणा-या/पोहोचणा-या विशेष गाड्यांना मुदतवाढ
05030 पुणे- गोरखपूर विशेष (दर शनिवारी) दि. ३.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल.
05029 गोरखपूर -पुणे विशेष (दर गुरूवारी) दि. १.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल.
टीप : 05030/05029 विशेष २ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, ५ द्वितीय आसन श्रेणी अशा सुधारित संरचनेसह चालविण्यात येईल.
टीपः या गाड्यांच्या मार्गांमध्ये, वेळेत, संरचनेत आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही.
आरक्षण : विशेष ट्रेनचे विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या आधीच सुरू करण्यात आलेले आहे.
या आहे रेल्वेच्या सुचना
या विशेष ट्रेनच्या तपशीलवार थांबे आणि वेळांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे.