India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सिन्नर – पुणे महामार्गावर ३२ वर्षीय ट्रकचालक युवकाचा खून

India Darpan by India Darpan
February 2, 2023
in क्राईम डायरी
0

सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील गोंदे येथील ३२ वर्षीय ट्रकचालक युवकाचा खून झाल्याची घटना घडली. बुधवारी रात्री आठ वाजेच्या ही घटना उघडकीस आली. संपत रामनाथ तांबे (३२) रा. गोंदे ता. सिन्नर असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पुणे – महामार्गावरील धोंडवीर नगर येथील शिवारात अन्नपूर्णा हॉटेलजवळ युवकाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी मयत युवकाची दुचाकी व छोटीसी तलवार आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी मयत संपत तांबे यांचा भाऊ गणपत रामनाथ तांबे याने सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात खूनाची फिर्याद दिली. सिन्नर पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अर्जूनराव भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी भेट देऊन तपासकामी सूचना केल्या. मयत संपत तांबे याच्या अंगावर धारधार शस्त्राने वार केल्याने घटनास्थळी रक्त सांडलेले दिसून येत होते. घटनास्थळी छोटीसी तलवारही पोलिसांना मिळून आली. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे अधिक तपास करीत आहेत. मयत संपत तांबे याच्या पश्चात आई, भाऊ आणि भाऊजाई असा परिवार आहे.


Previous Post

या व्यक्तींना आज आर्थिक समस्यांमधून मार्ग मिळेल; जाणून घ्या, शुक्रवार, ३ फेब्रुवारी २०२३चे राशिभविष्य

Next Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – संकटांपासून हे तुमचे रक्षण करतात

Next Post

इंडिया दर्पण - विचार पुष्प - संकटांपासून हे तुमचे रक्षण करतात

ताज्या बातम्या

शेतकऱ्याने उभारली कांदा, द्राक्षाची अनोखी गुढी; मागण्यांचे फलक लावून वेधले सरकारचे लक्ष

March 22, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

संतापजनक! ध्रुवनगरमधील ‘त्या’ चिमुकलीची हत्या नक्की कुणी केली? पोलिस तपासात समोर आली अतिशय धक्कादायक माहिती

March 22, 2023

या राज्यात तांब्यासोबत आढळली सोन्याची खाण

March 22, 2023

पाडवा पटांगणावर शिवकालीन शस्त्रविद्या व भारतीय व्यायाम पद्धतीचे सादरीकरण

March 22, 2023

कृषीमंत्र्यांकडून शेतपिकांच्या नुकसानीची अंधारात पाहणी; नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी

March 22, 2023

अखेर येवला शिवसृष्टीच्या कामाची स्थगिती शासनाने उठविली; भुजबळांना मोठा दिलासा

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group