सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर विधानसभा मतदारसंघात आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून ५ नवीन वीज उपकेंद्रे मंजूर झाली आहेत. २४ कोटी ५० लाख रुपये निधीतून होणाऱ्या या उपकेंद्रांतून अतिरिक्त ३३ मेगावॉट वीज उपलब्ध होईल. त्यातून मतदार संघातील ५४ हजार ग्राहकांना पुरेशा दाबाने वीजपुरवठा होणार आहे.
सिन्नर तालुक्यात दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत असल्याने सध्याच्या वीजपुरवठ्यावर अतिरिक्त दाब येत असल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होत असे त्यावर उपाय म्हणून मागील दोन-अडीच वर्षात आमदार कोकाटे यांनी अनेक ठिकाणी वीज उपकेंद्रांच्या क्षमता वाढविणे, नवीन विजवाहिन्यांची कामे शासन स्तरावरून करून घेतली. तथापि, मतदारसंघात भविष्यात विजेची मागणी वाढू शकते व त्यासाठी आणखी वीज उपकेंद्रांची आवश्यकता असल्याचे ओळखून नवीन वीज उपकेंद्रांच्या मंजुरीसाठी शासन स्तरावर प्रयत्न केले. यातून सिन्नर विधानसभा मतदार संघात एसीएफ व आरडीएसएस योजनेतून पाच वीज उपकेंद्रे मंजूर झाली आहेत आमदार माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील जनतेला दिलेली ही अनमोल भेट असल्याचे बोलले जात आहे.
५४ हजार ग्राहकांना होणार फायदा…
तालुक्यात पाणी पातळी चांगली असूनही रब्बी हंगामात वीजेअभावी शेतकऱ्यांना बागायत पिके घेण्यास अडचणी येतात. शिवाय औद्योगिक भागातील त्यामुळे या भागातील वीजेची समस्या सोडविण्याची मागणी आमदार कोकाटे यांच्याकडे उद्योजकांनी केली होती. कोकाटे यांनी ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यातून वीज उपकेंद्रे मंजूर झाली आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच दिवाळीपूर्वी यांची कामे सुरू होण्याची शक्यता आहे.
ही आहे नवीन वीज उपकेंद्र
भरविहिर खुर्द – ५ मेगावॅाट
पंचाळे (उजनी) – ५ मेगावॅाट
विंचुरदळवी – ३ मेगावॅाट
माळेगाव – १० मेगावॅाट
कचरा डेपो, सिन्नर – १० मेगावॅाट