मंगळवार, नोव्हेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सिद्धार्थ आणि कियाराला लग्नानिमित्त मिळाला हा भारी आहेर

फेब्रुवारी 12, 2023 | 5:12 am
in मनोरंजन
0
Siddhartha Kiara 1

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वात सध्या लग्न समारंभाचा ट्रेंड आहे. अनेक कलाकार बोहल्यावर चढत आहेत. आलिया – रणबीर बोहल्यावर चढले, आता नवीन वर्षाचा पहिला महिना सरत नाही तोच सिद्धार्थ – कियारा बोहल्यावर चढले आहेत. रील लाईफमधील ही जोडी आता रिअल लाईफमध्ये प्रत्यक्षात उतरली आहे. त्यांच्या लग्नाला सेलिब्रिटींची गर्दी होती. जैसलमेरमधील सूर्यागढ पॅलेस येथे हा विवाह सोहोळा रंगला.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. नुकतेच हे दोघे विवाहबद्ध झाले. सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर संपन्न झाला. या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर देखील त्यांच्या लग्नाला उपस्थित होता. आता लग्नानंतर त्याने या नवविवाहित दांपत्याला एक अनोखं गिफ्ट दिलं आहे.

५,६ आणि ७ फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ-कियाराचं लग्न जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये धुमधडाक्यात पार पडलं. ५ तारखेला मेहंदी, ६ फेब्रुवारीला हळद आणि संगीत समारंभ पार पडला. तर ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ही दोघं लग्न बंधनात अडकली. त्यांच्या लग्नानिमित्त करण जोहरने एक खास पोस्ट लिहित त्यांचं अभिनंदन केलं होतं. फक्त पोस्टच नाही तर त्याने त्यांच्या लग्नानिमित्त त्यांना एक खास भेटही दिली आहे.

बॉलिवूडचे पॉवर कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे लग्न झाल्यापासून सोशल मिडियावर त्याचीच चर्चा आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील त्यांनी अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केला आहे. जे पाहिल्यानंतर चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. करण जोहरपासून कंगना राणौतपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या जोडप्याचे कौतुक केले आहे. चित्रपटाच्या पडद्यावर जोडी साकारल्यानंतर आता खऱ्या आयुष्यातील या सुपरहिट जोडीने एक-दोन नव्हे तर तीन चित्रपट साइन केले आहेत. करण जोहरने सिद्धार्थ कियाराला त्याच्या आगामी तीन चित्रपटांसाठी साइन केल्याची बातमी आहे.

https://twitter.com/advani_kiara/status/1624007389950398464?s=20&t=6-U8joNzZm5N3co4Jx2FPw

‘शेरशाह’ चित्रपटाच्या यशानंतर चाहत्यांना सिद्धार्थ-कियाराची जोडी चाहत्यांना पसंतीस पडली आहे. ‘शेरशाह’ चित्रपटाच्या सेटवर दोघांनी रोमान्स केला. सिड-कियाराची रील लाइफ केमिस्ट्री आणि पडद्यावरचे प्रेम याला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. करणने या जोडीला दिलेला अनोखा आहेर म्हणजे त्याने सिद्धार्थ-कियाराला तीन बिग बजेट चित्रपट दिले आहेत. ‘शेरशहा’ चित्रपटातील सिद्धार्थ आणि कियाराची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. त्यानंतर हीच जोडी पुन्हा एकदा तीन वेगवेगळ्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटांची निर्मिती करण जोहर करणार आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ-कियाराने करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनशी एक करार केला आहे. त्यानुसार ही जोडी धर्मा प्रोडक्शनच्या ३ चित्रपटांत दिसणार आहे. त्यातील एक चित्रपट शशांक खेतान दिग्दर्शित करतील अशी चर्चा आहे. हा प्रोजेक्ट वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्या ‘बद्री की दुल्हनिया’ या फ्रेंचायझीच्या धर्तीवर असेल. पण हे चित्रपट कधी प्रदर्शित होतील हे अजून जाहीर झालेलं नाही.

दरम्यान, सिद्धार्थ आणि कियाराचा लग्न सोहळा शाही थाटात पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी पॅलेसमध्ये ८० खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. या लग्नाला १०० टे १५० पाहुण्यांनाच निमंत्रण होते. सिद्धार्थ आणि कियाराचे नातेवाईक, मित्र मंडळींबरोबरच बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

Siddhartha Malhotra Kiara Advani Wedding Special Gift

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शॉर्टस घातल्याने अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ट्रोल; अखेर दिले हे उत्तर

Next Post

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात हायकोर्टाच्या निदर्शनास आली ही गंभीर बाब

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस… जाणून घ्या ११ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 10, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

दारू पाजून तरुणीवर बलात्कार… अश्लील फोटो व्हायरल करण्याचीही धमकी… मित्रासमवेत शरीरसंबंधांची बळजबरी…

नोव्हेंबर 10, 2025
crime1 1
महत्त्वाच्या बातम्या

पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तरुणावर थेट तलवारीने सपासप वार… नाशकातील घटना…

नोव्हेंबर 10, 2025
Audi Q3 Signature Line
महत्त्वाच्या बातम्या

भारतात लॉन्च झाल्या ऑडीच्या या लक्झुरीअस कार…

नोव्हेंबर 10, 2025
thandi
मुख्य बातमी

थंडीच्या लाटेबाबत असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 10, 2025
bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
Next Post
khadse 1

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात हायकोर्टाच्या निदर्शनास आली ही गंभीर बाब

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011