India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात हायकोर्टाच्या निदर्शनास आली ही गंभीर बाब

India Darpan by India Darpan
February 12, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भोसरी जमीन घोटाळा प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने गंभीर स्वरूपाचे निरीक्षण नोंदविले आहे. राज्यातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांच्या भूमिकेत बदल झाल्याचे मत उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त केले. या प्रकरणात न्यायालयाने माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना दिलासा दिला आहे. त्यांच्याविरुद्ध पुढील सुनावणीपर्यंत आरोपपत्र दाखल करू नये, असे आदेश पुणे पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिले आहेत.

न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी ही याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी खडसे यांच्या वतीने वरिष्ठ वकील राजा ठाकरे यांनी गुन्हा दाखल झाल्यापासूनचा घटनाक्रम सांगितला. तसेच राज्यात जून २०२२ मध्ये सत्तांतर झाले आणि प्रकरणात नव्या तपास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. याच तपास अधिकाऱ्याने प्रकरणाच्या पुढील तपासाची मागणी केल्याची बाब ठाकरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदविले. या प्रकरणात खडसे यांना दिलासा देण्यात आला आहे. सोबतच खडसे यांच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

काय आहे नेमके प्रकरण?
भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांच्या तक्रारीवरून बंड गार्डन पोलिसांनी खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. खडसे यांनी महसूल मंत्री असताना अधिकारांचा गैरवापर करून भोसरी परिसरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीची ४० कोटी रुपयांची जमीन पत्नी आणि सुनेच्या नावे अवघ्या ३.७५ कोटींत खरेदी केल्याचा आरोप आहे. खडसे यांच्याविरोधात १० एप्रिल २०१७ रोजी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास नंतर एसीबीकडे सोपवण्यात आला. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

Bhosari Land Scam High Court Police Investigation


Previous Post

सिद्धार्थ आणि कियाराला लग्नानिमित्त मिळाला हा भारी आहेर

Next Post

संतापजनक! तरुणींचे अनैतिक संबंध… बाळांनाही जन्म… त्यानंतर विक्रीही…. हे सारे फक्त यासाठी… पोलिसही चक्रावले

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

संतापजनक! तरुणींचे अनैतिक संबंध... बाळांनाही जन्म... त्यानंतर विक्रीही.... हे सारे फक्त यासाठी... पोलिसही चक्रावले

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group