India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

India Darpan by India Darpan
January 31, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यासह राज्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. तालुक्यातील दहिदी येथे शेतकरी महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. शेतात एकटी असलेल्या या महिलेवर अज्ञात इसमाने फावड्याने घाव घातले. या महिलेच्या शरीराचे तुकडे करुन तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्येचे प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. आरोपी आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते. अशाच धर्तीवर मालेगाव तालुक्यातील दहिदी येथे घटना घडली आहे. दहिदी येथील शेतकरी महिला सुमनबाई भास्कर बिचकुले ही महिला शेतात एकटीच काम करीत होती. तर तिचे पती भास्कर हे मका विक्रीसाठी बाजारात गेले होते. लागवड केलेल्या कांद्याना पाणी भरण्याचे काम सुमनबाई करीत असतानाच अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर फावड्याने हल्ला केला. सर्वप्रथम सुमनबाईच्या दोन्ही पायांचे तुकडे अज्ञाताने केले. त्यानंतर या क्रूर अज्ञाताने फरफटत सुमनबाईला जंगलाच्या दिशेने नेले. त्यानंतर तेथे त्याने सुमनबाईच्या छातीवर आणि गळ्यावर जोरदार वार केले. तसेच, तिचे मुंडकेही छाटले. सुमनबाईच्या शरीराचे तुकडे करुन तिची हत्या करणारा क्रूरकर्मा लागलीच फरार झाला.

भास्कर बिचकुले हे घरी आले. त्यांनी शेतात पाहिले असता सुमनबाई दिसल्या नाहीत. त्यांनी बरीच शोधाशोध केली. अखेर त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला. शेतालगत असलेल्या जंगलात सुमनबाईच्या शरीराचे तुकडे छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. या भयंकर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shocking Malegaon Brutal Murder Farmer Women
Crime Nashik


Previous Post

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता भरावे लागणार एवढे परीक्षा शुल्क; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

खुशखबर! आता खासगी बसमध्येही महिलांना अर्धे तिकीट; ट्रॅव्हल्स कंपन्यांचा निर्णय

March 22, 2023

गांजाचा अवैध व्यापार करणाऱ्यांना न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

March 22, 2023
प्रातिनिधीक फोटो

दहावीनंतरच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा नक्की किती? केंद्र सरकारने केला खुलासा

March 22, 2023

शेतकऱ्याने उभारली कांदा, द्राक्षाची अनोखी गुढी; मागण्यांचे फलक लावून वेधले सरकारचे लक्ष

March 22, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

संतापजनक! ध्रुवनगरमधील ‘त्या’ चिमुकलीची हत्या नक्की कुणी केली? पोलिस तपासात समोर आली अतिशय धक्कादायक माहिती

March 22, 2023

या राज्यात तांब्यासोबत आढळली सोन्याची खाण

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group