इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – साधारणपणे स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट रोजी तसेच प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी रोजी शाळेमध्ये ध्वजवंदनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा होतो, याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येतो, तसेच काही ठिकाणी गोड गोळ्या, बिस्कीट, चॉकलेट देखील देण्यात येते. परंतु राजस्थानमध्ये एका शाळेत वेगळाच प्रकार घडला. तेथे चक्क शाळेत चक्क अफूचे वाटप करण्यात आले त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राजस्थानमधील एका सरकारी शाळेत स्वातंत्र्यदिनी अफू दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. शाळेत बसून अफूचे सेवन करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही बाब उघडकीस आल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा सुरू झाल्यावर चौकशीचे आश्वासन दिले आहे.
एका रिपोर्ट्सनुसार, प्रकरण बाडमेर जिल्ह्यातील गुडामलानी उपविभागातील रावली नाडी शाळेचे आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाळेचा परिसर स्पष्ट दिसत आहे. एक-दोन विद्यार्थीही चालताना दिसत आहेत. दि. १५ ऑगस्ट निमित्त शाळेत सोमवारी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी शाळेला दार लावून बसले. त्यानंतर अफू देण्यात आली. घटनास्थळी सर्वजण सुमारे दोन तास शाळेच्या आवारात बसून होते.
Rajasthan: स्वतंत्रता दिवस पर सरकारी स्कूल में बांटी गई अफीम, वीडियो वायरल होने पर अधिकारियों के हाथ-पांव फूले #Bikaner #Rajasthan #OpiumBikanerSchool #ViralVideohttps://t.co/VUlXlMflOv pic.twitter.com/3ksnpEfK6p
— Amar Ujala (@AmarUjalaNews) August 16, 2022
शाळेत अफू दिल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. शाळेत पोहोचेपर्यंत सगळे निघून गेले होते. त्याचवेळी, CBEEO ओमप्रकाश विश्नोई म्हणाले की, व्हिडिओ समोर आल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. याप्रकरणी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे जबाब घेऊन त्याचा अहवाल प्रांताधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.
शाळेचे चार व्हिडिओ समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये गावकरी शाळेच्या व्हरांड्यावर बसलेले दिसत आहेत. एक व्यक्ती खुर्चीवर बसून पैशाच्या व्यवहाराचा हिशेब करत आहे. यासोबतच व्याजात भर पडल्याचीही चर्चा आहे. व्हिडिओमध्ये एक सरकारी शिक्षकही दिसत आहे, जो रजिस्टरमध्ये बसलेल्या नागरिकांच्या सह्या घेत आहे. दुसरीकडे मदतीच्या रकमेतून अफू आणल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
Shocking Independence Day School Opium distribution
Rajasthan Bikaner Viral Video