इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘इंडियन आयडॉल’ या कार्यक्रमाद्वारे चर्चेत आलेली फरमान नाज सध्या तिच्या ‘हर हर शंभू’ गाण्यामुळेही चर्चेत आहे. तसं तर या गाण्याची मूळ गायिका आहे ओडिशा येथील अभिलिप्सा पांडा. फरमानी नाज हिने देखील हे गाणे उत्तमरीत्या सादर केले आहे. यासंदर्भातच आता एक नवीन माहिती समोर येते आहे. फरमान नाज हिने गायलेल्या या गाण्यानंतर गाण्याच्या कॉपीराइटविषयी चर्चा झाली. त्या आक्षेपानंतर फरमान हिच्या युट्यूब चॅनेलवरून हे गाणे काढण्यात आले आहे.
ऐन श्रावणात आलेले हे गाणे फरमानसाठी अत्यंत फायदेशीर ठरले. लोकांना देखील ते खूप आवडले. त्यानंतर मात्र हे गाणे गेल्याने फरमान अडचणीत आली. प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, शिव भजन गायल्याने फरमान हिच्या विरोधात फतवा काढण्यात आला. एका खासगी संकेतस्थळाला मुलाखत देताना, तिच्या भावाने मात्र याचा इन्कार केला आहे. या गाण्याचे गीतकार रितू शर्मा यांनी कॉपीराईटचा मुद्दा समोर आणल्याने फरमान हिच्या युट्यूब चॅनेलवरून हे गाणे हटवण्यात आले आहे.
रितू शर्मा हे देखील ओडिशाचे आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, फरमानी नाज हिने हे गाणे म्हटले, तर मला कसलाच आक्षेप नाही. पण, या गाण्याचा गीतकार म्हणून मला माझा हक्क मिळायला हवा. हे गाणे लिहिण्यासाठी मी मेहनत केली आहे. या गाण्याचे सर्व अधिकार शर्मा यांच्याकडे आहेत. त्यांच्याच युट्यूब चॅनेलवरून हे गाणे अपलोड करण्यात आले आहे.
Har Har Shambhu Song Removed from YouTube
Controversy Fatwa Farmani Naaz