शनिवार, नोव्हेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शिंदेंना धक्का? मंत्रीपद न मिळाल्यामुळे संजय शिरसाट पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाणार? चर्चांना उधाण

ऑगस्ट 13, 2022 | 11:19 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Sanjay Shirsat

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी त्यात ज्यांना संधी मिळाली नाही ते प्रचंड नाराज असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद तथा संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाठ हे आघाडीवर आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात पत्ता कट झाल्याने ते एकनाथ शिंदे गटाची साथ सोडून उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

पुढच्या वेळेस तरी मंत्रिमंडळात समावेश होईल की नाही याबद्दल शिरसाठ यांच्या कार्यकर्त्यांना शंका वाटते, मात्र आपला दुसऱ्या टप्प्यात मंत्री म्हणून नक्कीच विचार होईल, अशी अपेक्षा त्यांना वाटते. दरम्यान त्यांनी एक ट्विट केल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. बंडानंतर शिरसाठ शिंदे गटात सर्वात पहिले सहभागी झाले होते असे असतानाही त्यांना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या या व्हिडिओनंतर त्यांनी एकनाथ शिंदेंना इशारा तर दिला नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, काही वेळातच शिरसाट यांनी हे ट्वीट डिलीट देखील केले आहे.

जुन्या व्हिडिओचे ट्वीट डिलिट केल्यानंतर शिरसाटांनी आणखी एक ट्वीट करत काही गोष्टी नमुद केल्या आहेत. संजय शिरसाट यांच्या या ट्विटने राज्याचं राजकारण पुन्हा हादरवून सोडलेलं आहे. संजय शिरसाठ यांनी आपल्या ट्विट मधून उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केलेला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचं विधानसभेतलं एक भाषण ही त्यांनी त्या ट्विटला जोडलेलं आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे दिलेलं वचन आम्ही पाळतोच आणि दिलेला शब्द हा खरा करून दाखवतोच, असे म्हणताना दिसत आहेत.
सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आणि एकनाथ शिंदेंच्या गटाचा झेंडा खांद्यावर घेतला. मात्र सुरुवातीपासून शिंदे गटात सामील होऊनही शिरसाट यांना मंत्रिपद मिळालं नाही. अशातच काल रात्री संजय शिरसाट यांनी एक ट्वीट केलं.

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचं भाषण ट्वीट करत शिंदे गटाला इशारा तर दिला नाही ना अशी आता चर्चा सुरु झाली आहे. ट्वीट डिलिट केल्यानंतर शिरसाट यांनी म्हटलं की, आम्ही आजही शिवसेना आहोत. जो आमचा नेता असतो तो आमचा कुटुंबप्रमुख असतो. बाळासाहेबांनंतर उद्धव साहेब आमचे कुटुंबप्रमुख आहोत. आम्ही उद्धव ठाकरे यांना नेहमीच कुटुंबप्रमुख मानत आलो आहोत. आज जरी आमचे भांडण जरी झालं असलं तरी आम्ही त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही.

a7cf0290939526b037db2288fbf2b0eb166035613166884 original

आम्ही दूर जरी झालो असलो तरी ते आमचे कुटुंबप्रमुख होतेच. त्यांनी घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नव्हती. आमची भूमिका उद्धव ठाकरेंच्या विरोधात नव्हती. आमची भूमिका राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात होती. विचार पटत नव्हते म्हणून आम्ही विभक्त झालो. याचा अर्थ नातं तोडलेलं नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर तटस्थ राहिलो ते त्यांच्या भूमिकेवर तटस्थ राहिले. मंत्रिपदासाठी दबाव आणताय का असं विचारलं असता शिरसाट म्हणाले की, माझा स्वभाव तसा नाही. एखाद्यावर विश्वास ठेवला तर मान कापली गेली तरी हरकत नाही. मंत्रिपदासाठी मी भूकेलेला नाही. ज्या ठिकाणी चुकतं त्यावेळी बोलायला हवं. मला जे योग्य वाटतं ते मी स्पष्टपणे बोलतो. मंत्रिपद मिळालं किंवा नाही मिळालं हा विचार माझ्या डोक्यात कधीच येणार नाही, असंही शिरसाट म्हणाले.

शिरसाट म्हणाले की, मातोश्रीवर परत बोलावलं तर परत जायचं की नाही हा निर्णय एकनाथ शिंदे हेच घेतील. शिंदे जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही असू, असं शिरसाट म्हणाले. जर तुम्ही कुटुंबप्रमुखांची भूमिका बजावत असाल तर त्यावेळी कुटुंबाचं मतही जाणलं पाहिजे. ते कुटुंबप्रमुख राहिले असते, त्यांना आम्ही मानतही आलो आहोत. मंत्रिपद हुकल्यावर संजय शिरसाट काल पहिल्यांदा औरंगाबादमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी मला मंत्रीपद मिळेल विस्तार पूर्ण अजून झालेला नाही असा आशावाद त्यांनी व्यक्त केला होता. तुमचं नाव यादीतून कोणी कापलं असं विचारल्यावर मिश्किलपणे उत्तर देत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्याही वेळेस यादीतून माझं नाव कापलं आणि याही वेळेस कापले. मात्र निश्चितपणे पुढे मला मंत्रीपद मिळेल असं म्हणत एकनाथ शिंदेंवर मला विश्वास आहे असं संजय शिरसाट यांनी काल म्हटलं होते.

आमदारांनी बंडखोरीला मदत केली अशा अनेकांना पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद हवं होते, यामध्ये संजय शिरसाट आघाडीवर होते. परंतु पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात संजय शिरसाट यांचा पत्ता जवळपास कट झाला. संजय शिरसाट हे आधीपासूनच एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे शिरसाट यांना देखील मंत्रिपदाची अपेक्षा होती. यावेळच्या विस्तारात तुमचं नाव नसेल. मात्र पुढच्या वेळी मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यात तुमचं नाव निश्चित असेल. सध्या तरी तुम्हाला मंत्रिपद मिळणार नाही,” असे स्पष्ट संकेत संजय शिरसाट यांना देण्यात आले होते, त्यामुळे संजय शिरसाट अतिशय नाराज झाले होते.

Shivsena Rebel MLA Sanjay Shirsat Politics
Eknath Shinde Uddhav Thackeray Ministry
Cabinet Expansion

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तूरडाळीचे दर वाढत असल्याने केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

Next Post

अमित शहांकडून फडणवीसांचा गेम? बघा अनिल गोटे काय म्हणताय….

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
anil gote

अमित शहांकडून फडणवीसांचा गेम? बघा अनिल गोटे काय म्हणताय....

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011