धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे व मुंबई महानगर अध्यक्षपदी आशिष शेलार यांची भाजपने नियुक्ती केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेले ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत चिमटा काढला आहे. त्यानंतर भाजप समर्थक नेटक-यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.
चंद्रशेखर बावणकुळे व आशिष शेलार हे दोन्ही नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावडीचे, व अमित शाह यांच्या जवळचे. शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना 'जागा व लायकी' दाखवून दिलीय, असेच दिसतेय.@ShelarAshish @cbawankule
— Anil Gote (@anil_anna_gote) August 12, 2022
गोटे यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे, चंद्रशेखर बावणकुळे व आशिष शेलार हे दोन्ही नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावडीचे, व अमित शाह यांच्या जवळचे. शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना ‘जागा व लायकी’ दाखवून दिलीय, असेच दिसतेय.चंद्रशेखर बावणकुळे व आशिष शेलार हे दोन्ही नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावडीचे, व अमित शाह यांच्या जवळचे. शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना ‘जागा व लायकी’ दाखवून दिलीय, असेच दिसतेय. या ट्विट नंतर भाजप समर्थ नेटक-यांनी त्याला उत्तर दिले आहे.
या ट्रोलर्सचे आभार. तुम्ही अंधभक्त आमचे प्रेरणास्थान आहात. तुमच्या प्रोत्साहनामुळेच आम्हाला विचार मांडायला हुरूप येतो. आणखी नेटाने बोंबला. आम्हाला दुप्पट ऊर्जा मिळेल.@cbawankule @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/rRa3d1cSsJ
— Anil Gote (@anil_anna_gote) August 12, 2022
Dhule Ex MLA Anil Gote on Devendra Fadanvis