गुरूवार, नोव्हेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

उद्धव ठाकरेंकडे आहेत हे तीन प्रमुख पर्याय; आता पुढे काय होणार?

फेब्रुवारी 20, 2023 | 5:03 pm
in संमिश्र वार्ता
0
uddhav thakre e1656664598298

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह याची लढाई आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव गटाच्या वकिलांनी आव्हान देत या प्रकरणाची सुनावणी घेण्याची मागणी केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या वकिलाला उद्या या प्रकरणाचा उल्लेख करण्यास सांगितले आहे. आता उद्धव ठाकरेंकडे तीन प्रमुख पर्याय असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

उद्धव ठाकरे यांच्याधीच एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी उद्धव गट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, असे या याचिकेत म्हटले आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणी कोणताही निकाल देण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा युक्तिवादही ऐकून घेतला पाहिजे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

वडिलांनी स्थापन केलेला पक्ष निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव यांच्याकडून एका झटक्यात हिसकावून घेतला गेला आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव यांच्यासमोर तीनच पर्याय उरले होते. यामध्ये त्यांनी पहिल्या पर्यायाच्या माध्यमातून प्रयत्नही सुरू केले आहेत. म्हणजे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. उद्धव ठाकरेंच्या पर्यायांबद्दल जाणून घेऊया. तसंच उद्धव शिवसेनेला परत मिळवू शकतील की नाही हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया..

१. सर्वोच्च न्यायालयात जाणे
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देते हे पाहावे लागेल. दोन्ही गटांव्यतिरिक्त न्यायालय या प्रकरणी महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र राजभवन, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडून उत्तर मागवू शकते. यानंतरच शिवसेनेवरील शिंदे गटाची पकड कायम राहणार की उद्धव ठाकरे परतणार हे निश्चित होणार आहे. इथूनही उद्धव गटाला धक्का बसला, तर त्यांच्यासमोर एकच पर्याय उरणार आहे.

२. शिंदे गटाशी तडजोड करणे
उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा दुसरा पर्याय आहे. त्यासाठी ते भावनिक भूमिका घेऊ शकतात. पक्षश्रेष्ठींना पुन्हा आपल्या गोटात आणण्यासाठी ते जुने रडगाणे गाऊ शकतात. मात्र, त्याची शक्यता कमी दिसते. आता शिवसेनेची कमान पुन्हा ठाकरे घराण्याकडे जावी असे शिंदे गटाला जराही वाटत नाही. तसेच, आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. दोन्ही गटात मोठेच वितुष्ट निर्माण झाले आहे.

३. जयललिता फॉर्म्युला
उद्धव यांनी जयललिता फॉर्म्युल्याच्या मार्गावर चालण्यास सुरुवात केली आहे. यातूनही उद्धव पुन्हा शिवसेनेवर दावा ठोकू शकतात. १९८७ मध्ये एमजी रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्यांचा पक्ष एआयएडीएमके (AIADMK) मध्ये दोन गट पडले. पक्षाच्या बहुतांश आमदारांनी रामचंद्रन यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांची बाजू घेतली. जानकी राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. पण, जयललिता यांची संघटनेवर पकड होती. १९८९ च्या राज्य निवडणुकीत जयललिता यांनी जानकी गटापेक्षा चांगली कामगिरी केली. जानकी गटाला नऊ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. तर जयललिता गटाला २२ टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. जयललिता यांनी अखेरीस पक्ष संघटनेवर आणि त्यांच्या क्षमतेवर नियंत्रण ठेवून एआयएडीएमकेवर नियंत्रण मिळवले.

भावनिक राजकारणाचा आधार
जर ठाकरे न्यायालयीन लढाईतही हरले आणि शिंदे गटाशी चर्चा झाली नाही, तर उद्धव हे भावनिक राजकारणाचा पत्ता बाहेर काढून तो अतिशय आक्रमक पद्धतीने जनतेपुढे मांडू शकतात. महापालिका निवडणूक हा त्यांच्यासमोरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. जनतेमध्ये जाऊन ते भावनिक प्रचार करू शकतात. पक्षातील लढा आणि जुन्या गोष्टींची आठवण करून देण्याचा प्रयत्न ते करतील. मना  निवडणुकीत उद्धव गटाला यश मिळाल्यास ते पुन्हा शिवसेनेच्या नावावर लढण्याचा प्रयत्न करू शकतात. आणि निवडणुकीचा निकाल उद्धव गटाच्या बाजूने लागला नाही, तर निश्चितच त्यांना आणि त्यांचे पुत्र आदित्य यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा फटका बसू शकतो.

Shivsena Politics Uddhav Thackeray 3 Major Options

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इगतपुरी तालुक्यात लैंगिक अत्याचार करून २७ वर्षीय युवतीचा खून, संशयित ताब्यात

Next Post

राजस्थानात श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; प्रेयसीच्या शरीराचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

राजस्थानात श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; प्रेयसीच्या शरीराचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011