नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरी तालुक्यात अडसरे येथे युवतीवर लैंगिक अत्याचार करून तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे. १६ फेब्रुवारी रोजी शेतात एका भाताच्या गंजी जवळ या २७ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला होता. या नंतर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. पण, शवविच्छेदन केल्यानंतर हा या खूनाचा प्रकार समोर आला आहे.तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून घोटी पोलिसात अज्ञात संशयित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.
या गंभीर घटनेच्या तपासासाठी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा घोटी पोलिसांचे पथक संशयिताच्या मागावर आहेत. घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर, सहाय्यक निरीक्षक श्रद्धा गंधास, सहायक पोलीस निरीक्षक संजय कवडे, पोलीस हवलदार राऊत, सुहास गोसावी, बस्ते आदी पुढील तपास करत आहेत.