शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ठाकरेंचा हा आमदारही फुटणार? आदित्यसह केवळ एवढेच आमदार राहणार शिल्लक

by India Darpan
नोव्हेंबर 14, 2022 | 5:32 pm
in संमिश्र वार्ता
0
Uddhav Thackeray e1658391233517

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचे दिसून येत आहे. आता तर, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय गजानन कीर्तिकर यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांचा हा प्रवेश ठाकरे गटाला मोठा धक्का देणार ठरला आहे. यानंतर आता ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार राजन साळवीही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या वारंवार वाढत आहे. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी आज रत्नागिरी येथे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मतदारसंघातील विविध कामांसाठी राजन साळवी यांनी उदय सामंतांची भेट घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली तरी, आमदार साळवी आणि उदय सामंत यांच्यात अशी अचानक भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काही दिवसांपूर्वीच राजन साळवी हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, आपण ठाकरे गटातच राहणार असून शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार असल्याची भूमिका साळवी यांनी घेतली होती. त्यानंतर आमदार साळवी सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत विविध कार्यक्रम आणि बैठकीतही दिसले. पण उदय सामंत यांच्याशी साळवींनी अचानक भेट घेतल्याने ते शिंदे गटात जाणार असा अंदाज लावला जात आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चाललेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीवेळी तब्बल ४० आमदार फोडले होते. त्यामुळे ठाकरे गटाकडे १५ आमदार शिल्लक राहिले. त्यात उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य यांचाही समावेश आहे. आता राजन साळवी हे शिंदे गटात गेले तर ठाकरे गटाकडे आदित्य यांच्यासह केवळ १४ आमदार शिल्लक राहणार आहेत. म्हणजे आदित्य वगळता १३ आमदार असतील. त्यातही कोकणामध्ये ठाकरे गटाचा एकही आमदार राहणार नाही.

Shivsena Politics Rebel MLA Shinde Group Thackeray

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आकारले जाणारे शुल्क योग्य आहे का? उच्च न्यायालय म्हणाले….

Next Post

पेठ जवळील अपघातग्रस्त वळणावर मालट्रकने मोटारसायकलची धडक; मोटारसायकलस्वार गंभीर जखमी

Next Post
accident

पेठ जवळील अपघातग्रस्त वळणावर मालट्रकने मोटारसायकलची धडक; मोटारसायकलस्वार गंभीर जखमी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011