नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठ जवळील अपघातग्रस्त वळणावर मालट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला. त्यानंतर स्थानिकांनी त्याला पेठच्या ग्रामीण रुग्णालंयात उपचारासाठी नेले. पण, मोटारसायकलस्वाराच्या दोन्ही पायास जास्त मार लागल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले.
दिंडोरी – पेठ हदीतील सावळघाट व कोटंबी घाटावर रोज अपघात होत असतात. पण, त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. आरटीओ चेकपोस्टजवळ घडलेल्या अपघातास २४ तासाचा अवधी उलटत नाही तोवरच कोटंबी घाटातील त्याच वळणावर मोटरसायकल स्वाराचा हा अपघात झाला. याच रस्त्यावर नाशिक मनपा हद्दीतील नवीन रस्ता तयार करण्यासाठी रस्ता खोदून टाकल्याने जवळपास ४ ते ५ कि.मी. चे अंतर कापावे लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.