मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी अत्यंत आनंदाची वार्ता आहे. गटाचे खासदार संजय राऊत हे सध्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी तुरुंगात आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात आज विशेष न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे अनेक महिन्यांनंतर ते तुरुंगाबाहेर येणार आहेत.
मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राऊत यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक केली. त्यांच्यावरील ही कारवाई राजकीय सूडापोटी होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होत आहे. आता विशेष न्यायालयाने राऊत यांना मंजूर केला आहे. त्यामुळे ते तुरुंगाबाहेर येणार आहेत. तसेच, राऊत हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्तेही आहेत. त्यामुळे ठाकरे गटाची तोफ पुन्हा धडाडणार असल्याचे दिसून येत आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणी तपासाच्या तडाख्याला सामोरे जाणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज त्यांना जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ जमीन प्रकरणात राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने ऑगस्टमध्ये अटक केली होती. या प्रकरणी ईडीने राऊत यांच्या पत्नी आणि जवळच्या नातेवाईकांसह अनेकांची चौकशी केली आहे.
https://twitter.com/PTI_News/status/1590250122872377344?s=20&t=WcZB41WIQvk_umcA2KaHAA
विशेष न्यायाधीश एम.जी.देशपांडे यांनी राऊत यांच्या जामीन अर्जावर निकाल दिला. ईडी मुंबईच्या उत्तर उपनगरातील पत्रा चाळ प्रकल्पाची चौकशी करत आहे. तपासादरम्यान त्यांना अनेकवेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्याला ३१ जुलै रोजी अटक करण्यात आली होती आणि ८ दिवस ईडी कोठडीत घालवल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते.
बुधवार, २ नोव्हेंबर रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील निर्णय ९ नोव्हेंबरपर्यंत राखून ठेवला होता. विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी बचाव आणि सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर निकाल राखून ठेवला आहे. मात्र, न्यायालयाने राऊतच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली.
७ सप्टेंबर रोजी त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्याचवेळी राऊत यांनी दावा केला होता की, ईडीने आपल्यावर दाखल केलेला गुन्हा हा विरोधकांना दाबण्याचा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न आहे. गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेचा हिशेब आणि माहिती देण्यात आल्याचे १.०६ कोटी रुपये असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी जामीन आदेशाच्या अंमलबजावणीवर काही काळ स्थगिती मागितली आहे जेणेकरून ईडी न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल करू शकेल. जामिनावर स्थगिती देण्याच्या मागणीवर पीएमएलए न्यायालय आज दुपारी तीन वाजता आपला निकालही सुनावू शकते, असे वृत्त आहे.
Shivsena MP Sanjay Raut Grant Bail