India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

संजय राऊतांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ; दिवाळीही तुरुंगातच जाणार?

India Darpan by India Darpan
September 16, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. राऊत यांची तुरुंगातून बाहेर येण्याची प्रतीक्षा आता वाढणार आहे. कारण सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)ने राऊतांच्या जामीनाला मुंबई सत्र न्यायालयात तीव्र विरोध केला आहे. राऊत हे महिनाभरापासून न्यायालयीन कोठडीत आहेत. ते सध्या आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात आहेत. विशेष ईडी न्यायालयाने राऊतांना १९ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या सुनावणीत विशेष न्यायालयाने राऊतच्या जामीन अर्जावर ईडीने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश दिले होते. न्यायालयाच्या या आदेशानंतर आता ईडीने उत्तर दाखल केले आहे. प्रत्युत्तरादाखल ईडीने राऊत यांच्या जामीन अर्जाला स्पष्टपणे विरोध केला आहे. तत्पूर्वी, संजय राऊत यांनी विशेष न्यायालयात दावा केला होता की, ईडी तपास सुरू ठेवू शकते, परंतु त्यांना तुरुंगात ठेवल्याने काहीही होणार नाही. राऊत यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र, न्यायालयातील व्यस्ततेमुळे जामीन अर्जावर तातडीने सुनावणी होऊ शकली नाही.

काय आहे पत्रा चाळ घोटाळा?
चाळींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना कायमस्वरूपी घरे देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने (म्हाडा) सदनिका बांधण्याची योजना २००७ साली सुरू केली. गोरेगावच्या सिद्धार्थनगरमध्ये हे काम होणार होते. पत्रा चाळीच्या पुनर्विकासाचे काम गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. म्हाडाच्या ४७ एकर जागेत ६७२ घरे बांधण्यात आली आहेत. कंपनीला साडेतीन हजार फ्लॅट्स बनवायचे होते. सदनिका बांधल्यानंतर उर्वरित जमीन विकली जाईल, अशी म्हाडाची योजना होती. मात्र, १४ वर्षे उलटूनही कंपनीने येथे फ्लॅट बांधले नाहीत. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने म्हाडाची फसवणूक करून सदनिका न बांधता जमीन बिल्डरांना विकल्याचा आरोप आहे. यामुळे ९०१ कोटींहून अधिक नफा झाला. कंपनीने नंतर दुसरा प्रकल्प सुरू करून खरेदीदारांकडून १३८ कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप आहे. कंपनीने चुकीच्या पद्धतीने १०३४ कोटी रुपये कमावले आणि ती रक्कम आपल्या सहयोगींमध्ये वाटली. ही कंपनी HDIL ची सहयोगी कंपनी आहे. त्यात प्रवीण राऊत सूत्रधार होते.

संजय राऊत  यांचा संबंध
२०१८ मध्ये म्हाडाने गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध फसवणुकीचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवण्यात आले. २०२० मध्ये प्रवीण राऊतला अटक करण्यात आली होती, जो संजय राऊतचा जवळचा आहे. प्रवीण राऊत हे सारंग आणि राकेश वाधवन यांच्यासह कंपनीचे संचालक होते. पीएमसी बँक घोटाळ्यात वाधवान बंधूही आरोपी आहेत.

Shivsena MP Sanjay Raut ED Custody Court
Money Laundering Patra Chawl Scam


Previous Post

संतापजनक! ‘माझ्यावर दररोज १० ते १५ जण बलात्कार करायचे’, अल्पवयीन मुलीची पोलिसात धाव

Next Post

आपल्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी सुरू करणार ही मोठी योजना; देशाला होणार असा फायदा

Next Post

आपल्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी सुरू करणार ही मोठी योजना; देशाला होणार असा फायदा

ताज्या बातम्या

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे दररोज सकाळी ८.३० वाजता करतो जेवण… पण, का?

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

सर्वसामान्यांना मोठा झटका; १ एप्रिलपासून यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

March 29, 2023

दीड कोटी रोपांचा पुरवठा… अत्याधुनिक सोयी, सुविधा… असे आहे बारामतीचे भाजीपाला गुणवत्ता केंद्र..

March 29, 2023

अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहून सागवान काष्ठ आज रवाना होणार; शोभायात्रेची जय्यत तयारी, दोन हजार कलावंतांचा सहभाग

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक पीक कर्जवाटप… इतक्या शेतकऱ्यांना लाभ.. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यामुळे विक्रमी कामगिरी पुढाकाराचा परिणाम

March 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

स्टेट बँकेच्या शाखांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

March 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group