शनिवार, नोव्हेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अमृता फडणवीस यांचा स्विमिंगपूलमधील फोटो शेअर करत सुषमा अंधारे म्हणाल्या…

जानेवारी 3, 2023 | 2:58 pm
in संमिश्र वार्ता
0
8004 n

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतात. त्या बोलल्या काय, त्यांनी फोटो शेअर केला काय किंवा काहीही केले नाही तरीही त्यांचं नाव चर्चेत असतं. आता बघा ना… भाजप नेत्या चित्रा वाघ आणि शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांच्यात सुरू असलेल्या वादामध्ये अमृता यांच्या त्या फोटोची एन्ट्री झाली आणि मग सोशल मिडियाला तर खाद्यच मिळालं ना.

मॉडेल उर्फी जावेद बोल्ड फोटोशूटसाठी नेहमी वादात असते. अलीकडेच तिच्या एका फोटोवरून चित्रा वाघ यांनी ‘असला नंगानाच महाराष्ट्रात चालणारन नाही… मला जर ती भेटली तर तिला थोबाडून काढेन’ असा इशारा दिला होता. आता खरं तर हा वाद चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात होता. पण सध्या स्टेजवरून धुवाधार फलंदाजी करणाऱ्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी या वादात उडी घेतली. आणि हीच धमकी तुम्ही कंगना रणौत, अमृता फडणवीस आणि केतकी चितळे यांना देणार का? असा उघड उघड सवाल केला. विशेष म्हणजे केवळ सवाल केलेला नाही, तर त्यांनी तिघींचेही वादग्रस्त फोटो सुद्धा शेअर केले आहेत. सोबत एक भली मोठी पोस्टही त्यांनी फेसबुकवर टाकली आहे. धर्म आणि जात बघून कपड्यांवर टिका करणं चुकीचं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. सोबत अमृता फडणवीस यांचा स्वीमिंग पूलमधला फोटो शेअर करत यांनाही अशीच धमकी देणार का, असा सवाल केला आहे.

ही तर गरज आहे…
सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टवरून चित्रा वाघ यांच्यावर डरकाळी फोडताना क्षेत्राची गरज म्हणून सुद्धा पेहराव केला जातो, याकडे चित्रा वाघ यांचं लक्ष वेधलं आहे. साडी नेसून टेनिस खेळणं अवघड आहे, पण एक शिक्षक म्हणून माझा पेहराव त्या क्षेत्राला साजेसाच असावा, असंही त्या म्हणत आहेत.

जनतेचा मुद्दा कुठाय
नट्यांच्या कपड्यांवरून नसते वाद निर्माण करण्यात वेळ कशाला घालवता, यात जनतेचा मुद्दा कुठाय? असाही सवाल सुषमा अंधारे यांनी वाघ यांना केला आहे. विशेष म्हणजे नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचारांमध्ये आणि भाषेत असतो, असेही त्या म्हणाल्या आहेत.

सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट अशी
मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट.
पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच…

अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी?
उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
आणि जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का? किंवा त्यांना ( म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीसयांना ) मारहाणीची भाषा कराल का?
नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्या साठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल.
#सत्तेचा_माज #arrogance

https://www.facebook.com/andhare.sushama/posts/5929303393757081

Shivsena Leader Sushma Andhare Share Pic of Amruta Fadanvis
Politics Urfi Javed Chitra Wagh BJP

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक? बघा, डॉ. अमोल कोल्हे काय म्हणताय (व्हिडिओ)

Next Post

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणः लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या अडचणी वाढणार

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
malegaon bomb blast LT Col prasad purohit

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणः लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या अडचणी वाढणार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011