इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर आहेत की स्वराज्य रक्षक असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. त्याला निमित्त आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचे. अजित पवार म्हणाले होते की, आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही.’बाल शौर्य पुरस्कार’ हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी द्यावा.छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते,धर्मवीर नव्हते.त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे पवार यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचे सध्या पडसाद उमटत आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाकडून अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करणारे प्रथ्याक अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आता यासंदर्भात एक व्हिडिओ तयार केला आहे. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते की धर्मवीर होते या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओद्वारे त्यांनी दिले आहे.
बघा, त्यांचा हा व्हिडिओ
Actor and MP Dr Amol Kolhe on Chhatrapati Sambhaji Maharaj Video