मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आज सायंकाळी राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. फेसबुक लाईव्हद्वारे साधल्या जाणाऱ्या या संवादात ते काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षातील फूट आणि शिंदे गटाकडून सातत्याने ठाकरे गटाला दिले जाणारे आव्हान हे राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
बंडखोर शिंदे गटाने निवडणूक आयोगात चिन्हासाठी धाव घेतली. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना पक्ष हे नाव यावर निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे गटावर बंदी आणली आहे. हे दोन्ही गोठविण्यात आले आहे. तसेच, दोन्ही गटाने पक्षाची नावे आणि चिन्ह सूचवावेत, असे आयोगाने सूचित केले आहे. त्यावर उद्या निर्णय होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर ठाकरे हे आज काय घोषणा करणार, याची उत्सुकता शिवसैनिकांना लागून आहे. ठाकरे गटाचे नवे नाव आणि चिन्हाबाबत ते काही बोलणार की, शिवसैनिकांना दिलासा देणारे काही बोलणार यासह इतर अनेक विषयांना ते हात घालणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
https://twitter.com/ShivsenaComms/status/1579053980390686720?s=20&t=ufVOxY6lm2wwhRvO1NkUNw
Shivsena Chief Uddhav Thackeray FB Live Today Evening