नवी मुंबई – रायगड जिल्ह्यातील उरण येथे गव्हाण फाटा ते चिरनेर रस्त्यावरुन बाँयलर कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोची स्कुटी चालकाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात स्कुटी चालक वैभव म्हात्रे ( रा.हाशिवरे – अलिबाग) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर टेम्पो चालक व त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघात हा रविवारी सकाळी ठिक ६ -१५ च्या सुमारास टाकी गावच्या बस स्थानका जवळ झाला.
गव्हाण फाटा ते चिरनेर रस्त्यावरुन खारपाडा दिशेने बाँयलर कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोनी चिरनेरच्या दिशेने येणाऱ्या स्कुटी चालकाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कुटी चालक वैभव म्हात्रे ( रा.हाशिवरे -अलिबाग) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.तर सदर टेम्पो चालक सलिम हुसेन व त्यांचा साथीदार अब्दुल शेख हे गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती तिथे उपस्थित असलेले पुनाडे गावचे रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पाटील उरण पोलिसांना कळवली. माहिती मिळताच पोलिसांनी सदर अपघातग्रस्तांना या परिसरातील नागरिकांच्या मदतीने उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.