लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लासलगाव जवळील गोंदेगाव येथील निवृत्ती आहेर यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद झाला. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने स्थानिक शेतक-यांना पिंजरा लावण्याची मागणी केली होती. अखेर वनविभागाने पिंजरा लावल्यानंतर बिबट्या जेरबंद झाल्याने शेतक-या सुटकेचा निश्वास टाकला. वनविभागाने बिबट्या निफाड येथे हलविले आहे.