India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक ‘ईडी’ चौकशीतून बाद कसे झाले? अचानक असं काय घडलं? घ्या जाणून सविस्तर

India Darpan by India Darpan
September 21, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार प्रताप सरनाईक यांना सक्तवसुली संचालनालय (ईडी) चौकशी प्रकरणात दिलासा मिळाला आहे. ‘टॉप्स समूह’ गैरव्यवहाराशी संबंधित तपास बंद करण्याचा आर्थिक गुन्हे विभागाचा अहवाल महानगर दंडाधिकाऱ्यांनी स्वीकारला आहे. देशभरात अनेकांवर ईडीची जोरदार कारवाई होत असताना सरनाईक यांना कसा काय दिलासा मिळाला, असे अचानक काय घडले, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  त्यामुळे या प्रकरणाविषयी सविस्तर जाणून घेणे आवश्यक आहे.

काय आहे प्रकरण?
महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईच्या यलो गेट पोलिसांनी २८ ऑक्टोबर २०२० रोजी याप्रकरणी टॉप्स ग्रुपचे संस्थापक राहुल नंदा आणि इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. या प्रकरणातील गुन्ह्यांच्या आधारे ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा (मनी लॉंडरिंग) गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. टॉप्स ग्रुपचे माजी अध्यक्ष रमेश अय्यर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नंदा आणि इतरांनी कंपनीच्या खात्यांमधून मोठा निधी भारत आणि परदेशातील विविध खात्यांमध्ये वळवल्याचा आरोप केला होता.

या निधीचा वापर नंदा आणि इतरांनी मालमत्ता खरेदीसाठी तसेच वैयक्तिक कारणांसाठी केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा पुरवणाऱ्या संस्थेची १७५ कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. संबंधित तक्रारीनुसार २०१४मध्ये टॉप्स ग्रुप सर्व्हिसेस अँड सोल्युशन्स लिमिटेडने एमएमआरडीएशी करार केला. त्यात एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांच्या ठिकाणी ३५० ते ५०० रक्षक तैनात करण्याचे कंत्राटात नमूद करण्यात आले होते.

प्रत्यक्षात ७० टक्के सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आल्याचा आरोपदेखील करण्यात आला होता. ईडीने याप्रकरणी सरनाईक यांचा जवळचा सहकारी अमित चंदोले आणि टॉप्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक एम शशिधरन यांना अटक केली होती. चंदोलेला या कामासाठी कमिशन मिळाल्याचा आरोपाचा शोध घेत याप्रकरणाचे धागेदोरे पुढे प्रताप सरनाईक यांच्यापर्यंत गेले होते. ईडीने याप्रकरणी सरनाईक यांची चौकशीही केली होती. तसेच ईडीने अनेक ठिकाणी शोधमोहीमही राबवली होती.

म्हणून तपास बंद
आर्थिक गुन्हे शाखेचा अहवाल महानगर दंडाधिकाऱ्यांनी १४ सप्टेंबरला स्वीकारला होता. शिवाय, तक्रारदारानेही गैरसमजातून तक्रार नोंदवल्याचे आणि या अहवालाला आक्षेप नसल्याचे सांगितल्याने या प्रकरणाचा तपास बंद झाला आहे. ‘टॉप्स समूह’ गैरव्यवहाराचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे विभागाने जानेवारी महिन्यात न्यायालयासमोर प्रकरणाचा तपास बंद करण्याच्या मागणीचा अहवाल सादर केला होता. याप्रकरणी कोणताही गुन्हा घडल्याचे आढळले नाही, असा दावा करून पोलिसांनी हा अहवाल सादर केला होता. त्यानंतर लगेचच ‘टॉप्स ग्रुप’चे माजी व्यवस्थापकीय संचालक मारत शशिधरन यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला दिला.

तसेच शशिधरन यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ न करण्याची विनंती केली. शिवाय, आर्थिक गुन्हे विभागाने दाखल केलेल्या अहवालाबाबत ‘ईडी’ला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही असे म्हणले. याबरोबरच ‘ईडी’ला कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याचाही अधिकार नसल्याचा दावा शशिधरन यांच्यातर्फे करण्यात आला होता. याप्रकरणी उत्तर दाखल करण्याची मागणी ‘ईडी’तर्फे करण्यात आली आणि न्यायालयानेही ‘ईडी’ला उत्तर दाखल करण्यास सांगून शशिधरन यांच्या अर्जावर निर्णय होईपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली.

आता मूळ गुन्ह्याचा तपास बंद करण्याबाबतचा अहवाल महानगर दंडाधिकाऱ्यांनी स्वीकारल्याने या प्रकरणातील आरोपीने विशेष न्यायालयात धाव घेऊन आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांशी संबंधित प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी केली आहे. ‘टॉप्स ग्रुप’चे माजी व्यवस्थापकीय संचालक मारत शशिधरन हे यातील आरोपी आहेत. टॉप्स समूह’ गैरव्यवहाराशी संबंधित तपास बंद करण्याचा आर्थिक गुन्हे विभागाचा (ईओडब्ल्यू) अहवाल महानगर दंडाधिकाऱ्यांनी स्वीकारल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनाही ‘ईडी’ चौकशी प्रकरणात दिलासा मिळाला आहे.

‘टॉप्स समूह’ गैरव्यवहार प्रकरणाच्या आधारेच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) प्रताप सरनाईक यांच्याविरोधात गैरव्यवहाराची तक्रार दाखल करून तपास सुरू केला होता. परंतु महानगर दंडाधिकारी न्यायालयाने तपास बंद करण्याचा अहवाल स्वीकारल्याने सरनाईक यांची चौकशी बंद होण्याची शक्यता आहे.

..तर प्रकरणाला अर्थ नाही!
मूळ गुन्ह्यातून निर्दोष सुटका किंवा दोषमुक्ती झाली असल्यास आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणाला अर्थ राहत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने जुलै महिन्यात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याशी (पीएमएलए) संबंधित निकाल देताना स्पष्ट केले होते. त्याचाच दाखला देऊन या प्रकरणातील आरोपीने दोषमुक्तीची मागणी केली आहे.

Shinde Group MLA Pratap Sarnaik ED File Closed
Relief Legal Politics


Previous Post

महारेराचा महत्त्वपूर्ण निर्णय; बिल्डरला दिली याची परवानगी

Next Post

मोठी बातमी! पेट्रोल होणार तब्बल १० ते १२ रुपयांनी स्वस्त; सणासुदीत मिळणार जबरदस्त दिलासा

Next Post

मोठी बातमी! पेट्रोल होणार तब्बल १० ते १२ रुपयांनी स्वस्त; सणासुदीत मिळणार जबरदस्त दिलासा

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयची ही आहे भूमिका

February 7, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता दहावीवर हा सुरू आहे अभ्यास; शिक्षणमंत्री म्हणाले…

February 7, 2023

सिद्धार्थ-कियारा आज अडकणार लग्नबंधनात; दोघांनी इतक्या कोटींना घेतले नवे घर

February 7, 2023

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण; मंगेशकर कुटुंब नाशकात सुरू करणार वृद्धाश्रम

February 7, 2023

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले…. अखेर उर्फीने व्हिडिओच केला ट्रोल

February 7, 2023

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी लग्नाबाबत प्रथमच केला हा मोठा खुलासा

February 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group