India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दणका! लवादाने ठोठावला तब्बल १२ हजार कोटींचा दंड

India Darpan by India Darpan
September 10, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारला मोठा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम १२ हजार कोटी रुपये आहे. पर्यावरणाचे नियम न पाळल्याबद्दल शिंदे सरकारला हा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांनी राष्ट्रीय हरित लवाद कायद्याच्या कलम १५ अंतर्गत हा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण पर्यावरणाची हानी आणि घन व द्रव कचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे न करण्याबाबत आहे. गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्र सरकारने घनकचरा व्यवस्थापन आणि द्रव कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक काम केलेले नाही.

यासंदर्भात दिलेली मुदतही संपल्याचे हरित लवादाने म्हटले आहे. पर्यावरणाची सतत होणारी हानी भविष्यात थांबवायला हवी. त्यामुळे भूतकाळात पर्यावरणाची झालेली हानी भरून काढावी, असे हरित लवादाने म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारला द्रव कचरा व्यवस्थापनात चूक केल्याबद्दल १० हजार ८२० कोटी रुपये आणि घनकचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्याबद्दल १२०० कोटी असा एकूण १२ हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने दंडाची रक्कम येत्या दोन महिन्यांत जमा करावी आणि ती मुख्य सचिवांच्या निर्देशानुसार पर्यावरण रक्षणासाठी वापरली जावी, असे हरित न्यायाधिकरणाने म्हटले आहे.

पर्यावरण संरक्षण, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर यंत्रणा, गुणवत्ता निरीक्षण यंत्रणा, ग्रामीण भागातील गाळ व्यवस्थापन आदींवर निधी खर्च करावा, असे सुचवण्यात आले आहे. दुसरीकडे, राज्यात ८४ ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात यावेत, असे हरित न्यायाधिकरणाने म्हटले आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेते हे पाहणे बाकी आहे. हरित लवादाने निर्णयात मुख्य सचिवांची जबाबदारीही निश्चित केली आहे. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असे हरित मध्यस्थांनी सुचवले आहे.

Shinde Fadanvis Government 12 thousand Crore Fine by NGT


Previous Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – चिंट्या चित्रपट बघून घरी येतो तेव्हा

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – ११ सप्टेंबर २०२२

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - रविवार - ११ सप्टेंबर २०२२

ताज्या बातम्या

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे दररोज सकाळी ८.३० वाजता करतो जेवण… पण, का?

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

सर्वसामान्यांना मोठा झटका; १ एप्रिलपासून यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

March 29, 2023

दीड कोटी रोपांचा पुरवठा… अत्याधुनिक सोयी, सुविधा… असे आहे बारामतीचे भाजीपाला गुणवत्ता केंद्र..

March 29, 2023

अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहून सागवान काष्ठ आज रवाना होणार; शोभायात्रेची जय्यत तयारी, दोन हजार कलावंतांचा सहभाग

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक पीक कर्जवाटप… इतक्या शेतकऱ्यांना लाभ.. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यामुळे विक्रमी कामगिरी पुढाकाराचा परिणाम

March 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

स्टेट बँकेच्या शाखांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

March 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group