India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शिंदे आणि भाजपमध्ये अखेर या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; अशी मिळणार मंत्रिपदे

India Darpan by India Darpan
July 29, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जवळपास महिनाभराच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर एकनाथ शिंदे सरकारचे नवे मंत्रिमंडळ स्थापन करण्याबाबत एक करार झाला आहे. या नव्या मंत्रिमंडळात भाजप आणि शिंदे गटात ६५-३५ टक्के असा फॉर्म्युला ठरल्याचे सूत्रांकडून समजते. मंत्रिमंडळात अपक्षांचाही समावेश केला जाणार आहे. नव्या मंत्रिमंडळात भाजपचे २४ ते २५ आमदार आणि शिंदे गटातील १५ आमदारांना मंत्री केले जाऊ शकते. लवकरच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार मंत्रिमंडळाची घोषणा करू शकते, असे मानले जात आहे.

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी १ जुलै रोजी शपथ घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला. नाट्यमयरित्या, भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. तेव्हापासून शिंदे लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा करतील, अशी अटकळ बांधली जात होती. २९ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर आणि अखेर सरकार स्थापन करण्यासाठी भाजप हायकमांडची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा करणार असल्याचं वृत्त आज समोर आले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे आणि भाजपमध्ये सामंजस्य करार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

असे आहे सूत्र
एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये ६५-३५ चा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नव्या मंत्रिमंडळात भाजपचे २४ ते २५ आमदार आणि शिंदे गटातील १४ ते १५ आमदारांना मंत्रिपद दिले जाऊ शकते, असे मानले जात आहे. याशिवाय अपक्षांनाही शांत करण्यासाठी मंत्रिपरिषदेत जागा देण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकारमध्ये बंड केले तेव्हा ठाकरे सरकारमधील ९ विद्यमान मंत्र्यांनीही त्यांच्यासोबत बंड केले होते. या आमदारांना शिंदे सरकारमध्ये पुन्हा मंत्रीपद दिले जाणार असल्याचे नक्की झाले आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील अनेक खात्यांमध्ये मंत्रीपदांच्या रिक्त जागांमुळे अशांततेचे वातावरण आहे. अशा स्थितीत लवकरच मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे यांच्यावरही दबाव आहे. दोन दिवसांतच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखांवर मौन बाळगले आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लवकरच येईल, असे त्यांनी निश्चितपणे सांगितले.

Shinde And BJP Formula Fix for Cabinet Expansion Politics


Previous Post

सुरगाणा येथे प्रस्तावित वळण लिंक योजना प्रकल्प रद्द करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थांची वाढवलेली सदस्य संख्या रद्द होणार; राज्य सरकार लवकरच करणार घोषणा

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थांची वाढवलेली सदस्य संख्या रद्द होणार; राज्य सरकार लवकरच करणार घोषणा

ताज्या बातम्या

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

February 2, 2023

‘उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजूंंना अपात्र ठरवा’, वकीलांच्या संघटनेची हायकोर्टात धाव

February 2, 2023

अर्थसंकल्प नेमका कसा आहे? मंत्री रामदास आठवलेंचा व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्हीही बघा…

February 2, 2023

नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन

February 2, 2023

नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणीस सुरु, कुणाचे पारडे जड? सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील?

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group