India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सुरगाणा येथे प्रस्तावित वळण लिंक योजना प्रकल्प रद्द करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

India Darpan by India Darpan
July 29, 2022
in स्थानिक बातम्या
0

सुरगाणा – सुरगाणा तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या पश्चिम वाहिनी नद्यांवरील प्रस्तावित केलेला वळण लिंक योजना प्रकल्प तत्काळ रद्द करण्याची मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने येथील तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून करण्यात आली आहे. आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष चिंतामण गावित, युवा अध्यक्ष राजेंद्र पवार, गोपाळ धुम, सुवर्णा गांगोडे, नगरसेविका जयश्री शेजोळे, रंजित गावित, यशवंत राऊत, सरपंच राऊत आदींसह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव, शेतकरी उपस्थित होते. विविध मागणींचे निवेदन यावेळी उपस्थित तहसिलदार सचिन मुळीक यांना देण्यात आले.

समुद्राचे खारे पाणी गोडे पाणी करण्याची जी ठिकाणं निवडली आहेत ती भोळ्या भाबड्या आदिवासींची आहेत. केंद्र सरकारचे धोरण हे आदिवासींच्या विरोधातील असून आदिवासींना बुडविण्याची व्यवस्था या धोरणाची आहे. त्यामुळे तालुक्यातील पश्चिम वाहिनी असलेल्या नार, पार, तान व मान या नद्यांवर प्रस्तावित केलेल्या वळण लिंक योजना प्रकल्प अंतर्गत चिंचला, इवरदहाड, सोनगीर, उंबरठाण, मिलनपाडा, सारणेआवण, प्रतापगड, घोडी, राक्षसभुवन या ठिकाणचे वळण लिंक तत्काळ रद्द केले जावेत अशी मागणी केली. त्यापेक्षा स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना लाभदायक ठरणारे साठवण बंधारे बांधण्यात यावेत. त्यासाठी लघु पाटबंधारे योजना प्रस्तावित असलेल्या सतखांब, वांगण (सु.), सोनगीर, मालगोंदे, बाळओझर, वाघधोंड, उंबरविहिर, सालभोये, अलंगुण या योजना त्वरित मंजूर कराव्यात, रोजगार हमी योजनेअंतर्गत पंगारबारी, बेंडवळ, गळवड, भोरमाळ, ओरंभे, कोठुळा, चिकाडी, डोल्हारे, तळपाडा – १, मोठामाळ, वाळुटझिरा, साबरदरा, आवळपाडा, गहाले, टापूपाडा, बर्डीपाडा, रोकडपाडा, राक्षसभुवन, ठाणगाव, भेगू सावरपाडा, सुकतळे, मास्तेमाणी, म्हैसमाळ (करकवली नाला) या ठिकाणी अपुर्ण असलेले पाझरतलाव लवकरात लवकर मंजूर करून पुर्ण करावेत. १९७२ च्या दुष्काळ मधील रोजगार हमी योजनेअंतर्गत ३४ पाझरतलावांचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र त्यावेळी वनहरकतीमुळे हे पाझरतलाव अपुर्णावस्थेत आहेत. हे सर्व पाझरतलाव पुर्ण करावेत. अतिवृष्टीमुळे भात, नागली, वरई, तुटलेले बांध आदींची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तातडीने द्यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.


Previous Post

नाशिक – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Next Post

शिंदे आणि भाजपमध्ये अखेर या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; अशी मिळणार मंत्रिपदे

Next Post

शिंदे आणि भाजपमध्ये अखेर या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; अशी मिळणार मंत्रिपदे

ताज्या बातम्या

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र

बँकेचा चेक देताना चार वेळा विचार करा! बाऊन्स झाला तर आता होणार ही कठोर कारवाई

January 28, 2023

गर्लफ्रेंडने तुडवले, कंपनीनेही दूर लोटले! ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कची जगभरात जोरदार चर्चा

January 28, 2023

इंडिया दर्पण – विचार पुष्प – तुमची प्रगती अखंडपणे चालू राहील

January 28, 2023

डोंबिवलीहून नवी मुंबई आता अवघ्या काही मिनिटांत; पारसिक बोगदा दोन्ही बाजूने खुला

January 27, 2023

अनेक दशके झाली तरी वेठबिगारीचं भूत आदिवासींच्या मानगुटीवर का आहे? त्याचं मूळ नक्की कशात आहे?

January 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group