नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सेक्स वर्कर म्हणजे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या बाबतीत समाजाचा दृष्टिकोन नेहमीच विपरीत असतो, परंतु सेक्स वर्कर या देखील सर्व समाजाचा घटक आणि, देशाच्या नागरिक असतात, हे आता कायद्याने देखील मान्य झाले आहे. त्यामुळे त्यांना देखील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे हक्क मिळणे गरजेचे ठरते. त्यामुळेच त्यांना देखील कोणत्याही सोयी सुविधा मिळण्यासाठी आधार कार्ड देणे गरजेचे ठरते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सेक्स वर्कर यांना आधार कार्ड देण्याचे निर्देश दिले आहेत
सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या प्रकरणावर सुनावणी करताना सर्व सेक्स वर्कर्सना आधार कार्ड जारी करण्याचे आदेश दिले आहेत. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, देशातील व्यावसायिक क्रियाकलापांची पर्वा न करता प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा आणि सन्मान मिळण्याचा अधिकार आहे.
न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने विशेषत: सेक्स वर्कर्सच्या गोपनीयतेचा भंग होऊ नये असे निर्देश दिले. सुप्रीम कोर्टाचा आदेश हे सेक्स वर्कर्सना सशक्त बनवण्याच्या आणि त्यांना समान अधिकार देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केलेल्या प्रोफॉर्मा प्रमाणपत्राच्या आधारे लैंगिक कामगारांना आधार कार्ड जारी केले जातील.
सदर कागदपत्रे ही नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (NACO) च्या राजपत्रित अधिकारी किंवा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीच्या प्रोजेक्ट डायरेक्टरद्वारे सादर केली जातील. अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्णयाची गांभीर्याने आणि नि:पक्षपातीपणे अंमलबजावणी करावी, अशा कडक सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, लोक आणि सेक्स वर्कर यांच्यातील दरी भरून काढता यावी आणि सेक्स वर्कर्सना सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी आधार कार्डची कल्पना महत्त्वाची आहे.
सुप्रीम कोर्टाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोणत्याही ओळखीचा पुरावा नसलेल्या आणि रेशन नाकारलेल्या सेक्स वर्कर्सची ओळख प्रक्रिया सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते. तसेच सेक्स वर्कर्सचे आधार कार्ड मिळाल्याने त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यात मोठा हातभार लागेल, असा विश्वास आहे. आतापर्यंत, सेक्स वर्कर्सकडे त्यांची ओळख प्रस्थापित करण्यासाठी कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, सेक्स वर्कर्सकडे आधार कार्ड असेल आणि त्यांना पूर्वीच्या विभागात उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा मिळू शकतील.