इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एका घराला आग लागली. पोलीस, रेस्क्यू टीम, अग्नीशमन दल सारे पोहोचले. लोक जमले. आग विझविण्याचे काम सुरू झाले. अग्नीशमन दलाने आपले काम पूर्ण केल्यावर घरात कुणी अडकलेले तर नाही हे बघण्यासाठी ते आत गेले आणि भलतेच घडले.
हैदराबादच्या सिकंदराबादमधील रेजिमेंट मार्केटमध्ये एका घराला आग लागली. पोलीस आणि रेस्क्यू टीम तातडीने तिथे दाखल झाले. आग विझविण्याचे काम सुरू झाले. आग विझविल्यानंतर घरात कुणी अडकले आहे का किंवा कुणी जखमी झाले आहे का, हे तपासण्यासाठी पोलीस आत शिरले तर त्यांच्या हाती पैशांचा ढीगच लागला. म्हणजे लाख-दोनलाख नव्हे तर तब्बल १ कोटी ६४ लाखांची रोकड आणि सोने-चांदीचे दागीणे घरात साठवलेले होते.
हवालाचा पैसा
पोलिसांनी तातडीने त्याचा हिशेब करायला घेतला. हे पैशांचे घबाड संबंधिताने बेडरूममध्ये लपवून ठेवले होते. पोलिसांनी संपूर्ण रक्कम जप्त करून घेतली. हा हवालाचा पैसा असावा, अशी शंका पोलिसांना आहे. पुढील तपास सुरू आहे. पण घराला आग लागणे संबंधित व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. कारण या घटनेने घराचे आणि घरातल्या वस्तूंचे तर नुकसान झालेच, शिवाय हाती असलेला रग्गड पैसाही आरोपीला गमवावा लागला आहे.
सरकारी कामाशी संबंध
या घराच्या मालकाचे नाव श्रीनिवासन असून घटना घडली तेव्हा ते घरी नव्हते. ते एका कंपनीचे डीजीएम आहेत. आणि याच कंपनीच्या माध्यमातून सरकार विद्युत कराराचा व्यवसाय करते. त्यामुळे सरकारी यंत्रणेतील पैसा तर घरात साठवून ठेवलेला नाही, अशी शंका पोलिसांना आली आहे.
https://twitter.com/vineet8aug/status/1657677765548863488?s=20
Secunderabad Home Fire Rescue Operation Video Viral