कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीदायक वातावरणात एक दिलासादायक बातमी आहे. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या वैज्ञानिकांकडून तयार करण्यात आलेल्या नव्या अँटीव्हायरल थेरपीमुळे कोरोना संसर्ग ९९.९ टक्के नायनाट करण्याचा दावा करण्यात आला आहे.
नव्या अँटीव्हायरल थेरपीद्वारे फुफ्फुसामधील कोरोना विषाणूंचा शोध घेऊन ते नष्ट केले जातात. जेणेकरून पुन्हा संसर्ग होऊ शकणार नाही. कोरोनाविरोधात लढा देताना अँटीव्हायरल थेरपीला एका शस्त्राच्या रूपात पाहिले जात आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ग्रिफिथ विद्यापीठाच्या मेंजिज हेल्थ इन्स्टिट्यूट क्विंन्सलँड (एमएचआयक्यू) च्या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणार्या वैज्ञानिकांच्या पथकाने ही अँटीव्हायरल थेरपी यशस्वीरित्या तयार केली आहे. सध्याच्या परिस्थितीत टॅमीफ्लू, जानामिविर आणि रेमडेसिव्हिर आदी औषधे फक्त विषाणूचे लक्षणे घटविण्यास मदत करत आहेत.
जिन सायलेंसिग आरएनए तंत्रज्ञानाचा वापर
अँटीव्हायरल थेरपीद्वारे विषाणूच्या जिनोमवर थेट हल्ला केला जातो. त्यासाठी जिन सायलेंसिंग एसई-आरएनए (स्मॉल इंटरफियरिंग-आरएनए) तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. एसई आरएनएच्या माध्यमातून विषाणूला पुन्हा बनण्यापासून रोखले जाते. ग्रिफिथ विद्यापीठातर्फे तयार करण्यात आलेले लिपीड नॅनोकण एसई आरएनएद्वारे फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरले जातात. जिन सायलेंसिंग आरएनए तंत्रज्ञानाला ऑस्ट्रेलियामध्येच १९९० मध्ये सर्वात प्रथम विकसित करण्यात आले होते. या तंत्रज्ञानाद्वारे श्वसनाच्या आजारांवर उपचार करण्यात यश मिळाले आहे.
इंजेक्शनच्या माध्यमातून पेशींमध्ये पुरवठा
एमएचआयक्यूचे संशोधन प्रा. निगेल मॅकमिलन हे या थेरपीबद्दल सांगतात, या थेरपीमध्ये एसआय आरएनएचा वापर करून विषाणूच्या संसर्गाला ९९.९ टक्क्यांपर्यंत कमी केले जाते. नॅनोकणांना फुफ्फुसांच्या पेशी आणि सायलेंस व्हायरल जिनच्या एका विस्तृत श्रृंखलेपर्यंत पोहोचले जाते. ते विषाणूंच्या कणांना नष्ट करण्याचे काम करतात. या औषधाला इंजेक्शनच्या माध्यमातून पेशींमध्ये पुरविले जाते. त्याला नॅनोपार्टिकल असे म्हणतात.
नव्या व्हेरिएंटवरही उपाचार शक्य
सिटी ऑफ होपमधील सेंटर फॉर जिन थेरपीचे प्राध्यापक आणि सहाय्यक संचालक केविन मॉरिस सांगतात, हा उपचार सर्व बिटा कोरोना विषाणूसारख्या सार्स विषाणू (सार्स-कोव-१) यासह सार्स-कोव-२ आणि भविष्यात उत्पन्न होणार्या कोणत्याही नव्या व्हेरिएंटवर काम करण्यासाठी संरचना तयार करण्यात आली आहे. अल्ट्रा संरक्षित विषाणूच्या जिनोमवर हा काम करतो.
खोली तापमानात एक महिना ठेवू शकतो
नॅमोकणांना १२ महिन्यांसाठी ४ डिग्री सेल्सियसवर आणि खोलीच्या तापमानात एक महिन्याहून अधिक काळ ठेवले जाऊ शकते, असे संशोधनकर्त्यांनी सांगितले. याचाच अर्थ संसर्गग्रस्तांवर उपचार करण्यासाठी याचा खूपच सोप्या पद्धतीने वापर करू शकतो.